सातारा

शरद पवारांसोबत रहा तुमचे प्रश्न सुटतील; रामराजेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

राहूल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (जि. सातार) : आगामी जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी गट-तट बाजूला ठेऊन कामाला लागण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी कार्यकर्त्यांना दिले. रणदुल्लाबाद (ता.कोरेगाव) येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्‌घाटन रामराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, यशवंतराव माने, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोठी कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीपासून सत्ता ताब्यात लागते. एकनिष्ठ कार्यकर्ते सोबत असले की विकासकामे करण्यास बळ मिळते असे सांगून रामराजे म्हणाले, ""सध्या काहीजण वरिष्ठ पातळीवरून राजकारण करून स्थानिक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही शरद पवार यांच्यासोबत राहिलात तर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत. रणदुल्लाबाद, सोळशी व नायगावला नांदवळ धरणातून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी मी प्रयत्नशील असून, लवकरच मंत्रालयात बैठक लावली जाईल.'' विठ्ठल मंदिराच्या सभामंडपासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले. बाळासाहेब सोळसकर यांचे भाषण झाले. 

शिक्षक संघटनेत चंगळवादी नेत्यांची चलती; बलवंत पाटलांची खरमरीत टीका

पेढ्याच्या भैरोबाला पर्यटनस्थळ करू; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आश्वासन

प्रारंभी विठ्ठलराव जगताप यांचा शताब्दी महोत्सवी सत्कार आणि सीताराम माने यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन रामराजेंच्या हस्ते करण्यात आले. वयाची 80 पार केलेल्या ज्येष्ठांचा तसेच कोविडयोद्धे, पोलिस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य अधिकारी यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भागातील नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारदेखील करण्यात आला. लालासाहेब शिंदे, मंगेश धुमाळ, सतीश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, गजानन जगताप, गोवर्धन जगताप, सुरेश देशमुख, सपना ढमाळ, नीता सोनवणे, प्रकाश चव्हाण, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. जितेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. सतीश ढमाळ व विलास जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच मंगेश जगताप यांनी आभार मानले. 

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार तर ६ जण जखमी

रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी बजेटमध्ये करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा वाचा एका क्लिकवर

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT