सातारा

फलटणकरांच्या तक्रारी धडकताच खूद्द रामराजेच विकासकामाच्या ठिकाणी दाखल

किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : शहरामध्ये भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. नागरिकांची हेळसांड न होता भुयारी गटार योजनेचे काम करण्याबाबतच्या सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
 
सभापती निंबाळकर यांनी नुकतीच शहरातील बुरूड गल्ली, रिंग रोड परिसर, पृथ्वी चौक, डी. एड. कॉलेज चौक, विद्यानगर परिसर येथील भुयारी गटार योजनेच्या सद्यःस्थितीतील कामाची पाहणी केली. या वेळी संजीवराजे निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेविका प्रगती कापसे, नगरसेवक किशोरसिंह निंबाळकर, असिफ मेटकरी, श्रीमंत रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, युवा नेते तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक किशोर पवार आदींची उपस्थिती होती.

फुलांच्या सुगंधाने दरवळणार शेरे; माउलीकडून तब्बल 1800 फुलझाडांचे रोपण
 
शहरामध्ये भुयारी गटार योजना सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंजूर करून आणली आहे. भुयारी गटार योजना पूर्ण होण्यासाठी रस्ते खोदण्याशिवाय पर्याय नाही. त्यामध्ये काही अडचणी आलेल्या होत्या. त्या दूर करून भुयारी गटार योजनेचे प्रत्यक्षात काम शहरामध्ये सुरू आहे. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी रस्त्यामध्ये चर काढला होता. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत रामराजे यांच्याकडे फलटणकरांच्या तक्रारी पोचल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी केली व संबंधितांना योग्य प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती संजीवराजे निंबाळकर यांनी दिली.
 
संजीवराजे म्हणाले, ""भुयारी गटार योजनेचे ज्या रस्त्यावर काम सुरू आहे ते रस्ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यांसाठी रामराजे निंबाळकर यांनी भरीव निधी मंजूर करून आणलेला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून, ते लवकर करून घेतले जाणार आहे.'' नागरिकांची निश्‍चित गैरसोय होत आहे; परंतु भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत फलटणकरांना थोडीशी गैरसोय सहन करावी लागणार आहे, असेही संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

सातारा-पंढरपूर महामार्गालगतचा धोकादायक नेर फाटा ठरतोय वाहतुकीस अडथळा 

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT