सातारा

गोरेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, देशमुख स्वगृही; माण-खटावातील राजकीय समीकरण बदलणार

Balkrishna Madhale

सातारा : माणगाव-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये बुधवारी मुंबईत प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. देशमुखांच्या या प्रवेशमुळे काँग्रेस पक्षाला निश्चित बळ मिळणार असून माण-खटावातली राजकीय समीकरणं बदलणार आहेत. जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटावात काँग्रेसला उतरती कळा आली होती. मात्र, देशमुखांच्या घरवापसीने काँग्रेसचा हात 'बळकट' होणार आहे.
 
रणजितसिंह देशमुखांवर आमच्याकडून अन्याय झाला, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहोत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचे नुकसान झाले होते. आता रणजितसिंह हे स्वगृही परतल्याने काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष, तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. काही दिवसांपूर्वी कऱ्हाडात देखील आपापसातील मतभेद विसरुन विलासकाका उंडाळकारही स्वगृही परतल्याने कऱ्हाडात देखील काँग्रेसची ताकद वाढणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाला बळ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bonfire Ban: शहरात शेकोटी पेटवणे आता महागात पडणार! नियम मोडल्यास थेट दंड; पालिकेचा मोठा निर्णय

MPDA Act : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दारूविक्रेत्याला अखेर ताब्यात घेतले; सुरेश बिरे याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी

सचिन पिळगांवकर झाले 'डॉक्टर', महागुरूंना मिळाला अनोखा सन्मान, पोस्ट Viral

Marathi News Live Updates : रविवार ठरला अपघात वार, विविध अपघातात ३५ जणांचा मृत्यू

Gangapur News: डॉ. भगवान सटालेंना राज्यस्तरीय जबाबदारी! महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत निवड

SCROLL FOR NEXT