सातारा

महाविकास आघाडीची राज्यात दडपशाही : रणजितसिंह मोहिते-पाटील

प्रशांत घाडगे

सातारा : भाजप सरकार सत्तेत असताना जनतेच्या हिताचे निर्णय घेतले होते. या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याची टीका आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी येथे केली. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात दडपशाही करत जातीजातीत दरी निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
 
महाविकास आघाडीला सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाल्याने तीनही पक्षांचा कारभार मांडण्यासाठी मोहिते- पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते. सध्या देशभरात कोरोनाचे संकट उभे ठाकले असून या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य केले आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

ते म्हणाले, ""राज्यात कोरोना सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून गैरव्यवहार करणारांना सरकार पाठीशी घालत आहे. तसेच महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असल्याची केवळ घोषणा केली असून प्रत्यक्षात 18 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.'' मराठा आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी उदासीन आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. भाजप सरकार सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, सध्या सरकारची आरक्षणाबाबत भूमिका पाहता महाविकास आघाडी ही मराठा आरक्षणाच्या विरोधी असल्याचे सांगत श्री. पाटील यांनी या आघाडीवर जोरदार टीका केली.

उदयनराजेंच्या टीकेला शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर; केंद्राकडे पाठपुराव्याचा दिला सल्ला 

"पुढच्या वेळी दक्षता घेणार' 

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने लावलेल्या फलकावर काही ठराविक लोकांचे फोटो होते. त्यावेळी जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभेतील खासदार व आमदारांचा फोटो नसल्याबाबत पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष पावसकर यांना प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडे पाहत पुढील वेळी नक्की दक्षता घेतो, असे उत्तर देत या प्रश्‍नाला बगल दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT