MLA Ranjitsinh Bhosale appeals to rename Satara district as ‘Rajdhani Satara’ to reflect its historic significance. Sakal
सातारा

Satara News : सातारा जिल्ह्याला ‘राजधानी सातारा’ नाव द्या; रणजितसिंह भोसलेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

Rename Satara District as ‘Rajdhani Satara’: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानातून जो इतिहास घडला, तो या भूमीत आजही जिवंत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा हा केवळ एक भौगोलिक अस्तित्व नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही पदस्पर्शाने पावन झालेला, त्याग, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असणाऱ्या सातारा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजधानी सातारा’ करावा, अशी मागणी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना निवेदनाद्वारे केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानातून जो इतिहास घडला, तो या भूमीत आजही जिवंत आहे. त्यामुळे साताऱ्याचे ‘राजधानी सातारा’ असे नामकरण होणे ही केवळ एक शाब्दिक प्रक्रिया नसून, आपल्या परंपरेला, शौर्याला व अस्मितेला दिलेला आदर आहे. त्यामुळे साताऱ्याचे नाव ‘राजधानी सातारा’ असे पाहिजे, अशी मागणी भोसले यांनी केली. या वेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, प्रदीप माने, वासुदेव माने, संभाजी पाटील, योगेश फाळके, नीलेश मोरे, नवनाथ पाटील, राजू केंजळे व इतर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: प्रकाश आंबेडकर, वामन मेश्राम, पुरुषोत्तम खेडेकर टार्गेटवर; प्रवीण गायकवाड यांचा धक्कादायक आरोप

Income Tax: 24 तासांत मिळतोय ITR रिफंड, आजच फाईल करा... उद्या बँक खात्यात पैसे जमा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Beed : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, बेशुद्धावस्थेत नेलं रुग्णालयात; १८ महिन्यांपासून पतीचे मारेकरी मोकाट, अटकेची मागणी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राच्या जलवाहतूक क्षमतेचा वापर करून राज्याला आणि देशाला सागरी महाशक्ती बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल- देवेंद्र फडणवीस

स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकला, ख्रिश्चन बायको केली आणि आता... बिग बॉस फेम रीलस्टारची रितेश देशमुखवर टीका

SCROLL FOR NEXT