सातारा

दुर्मिळ 'माऊंटन इंपेरियल' पारवा आढळल्याने पक्षीप्रेमींत आनंद

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : विविध जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना (Koyna) परिसरात अभ्यास दौऱ्यादरम्यान "डिस्कवर कोयना टीम'च्या सदस्यांना दुर्मिळ माउंटन इंपेरियल पारवा आढळून आला आहे. डिस्कवर कोयना टीमच्या वतीने आठवड्यातून एकदा अभ्यास दौरा आखला जातो. 

अशाच अभ्यास दौऱ्यावर असताना अचानक या पक्ष्याचे दर्शन झाले. याला इंग्रजीत माउंटन इंपेरियल पिजण असे म्हणतात तर शास्त्रीय नाव डुकुला बाडिया असे आहे. पक्ष्याची लांबी 43 ते 51 सेंटिमीटर असते. याचे शेपूट लांब असून, पंख जाड गोलाकार असतात. अंतर्भाग, डोळे व नाक राखाडी असून, मान पांढरट असते. पंख तपकिरी चॉकलेटी असतात. पंखांच्या खालील बाजू फिक्कट राखाडी असते व शेपूट काळसर असते. मार्च ते ऑगस्ट याचा विणीची हंगाम असतो. पक्ष्याचे प्रमुख खाद्य फळे व बेरी आहे.

डिस्कवर कोयना टीममार्फत आजपर्यत पक्षी, साप मिळून हजारो जिवांचे फोटो व रेकॉर्ड मिळवण्यात आले आहेत. यासाठी पक्षीमित्र संग्राम कांबळे, पक्षीमित्र महेश शेलार, सरपटणारे-उभयचर व कीटक अभ्यासक विकास माने, सर्प अभ्यासक निखिल मोहिते यांच्यासह सर्व टीम प्रयत्न करत आहे.

कऱ्हाडकरांना मिळणार दिलासा? पालिकेची उद्या अर्थसंकल्पीय बैठक

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT