office Sakal
सातारा

सातारा : पावसाळ्यापूर्वीचे पुनर्वसन कागदावर

पाटणमधील ४० गावांचा प्रश्‍न; नऊ महिन्यांनंतरही कार्यवाही शून्यच

जालिंदर सत्रे

पाटण - जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. दुर्घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी धूळखात पडला आहे. पावसाळा सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी राहिला असून ढोकावळे व मिरगाव या दोन गावांच्या व्यतिरिक्त अजून ४० गावांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसनाकडे कोणी गांभीर्याने पाहणार का? पावसाळ्यापूर्वी बाधितांना निवारा शेड मिळणार का? आदी सवाल नुकसानग्रस्तांतून विचारले जात आहेत.

पाटण तालुक्यासाठी २२ जुलै २०२१ ची रात्र काळरात्र ठरली. रात्रीच्या पोटात ७०० मिलिमीटर एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आणि होत्याचे नव्हते झाले. कोयना विभागातील ढोकावळे, मिरगाव, बाजे, हुंबरळी आणि मोरणा विभागातील आंबेघर तर्फ मरळी या गावांतील अनेक घरे ही डोंगर उतार खचल्याने भरावाखाली गाडली गेली. संबंधित घरातील जनावरांसह माणसे झोपेत असताना भरावाखाली सापडली. पाच दिवसांच्या अथक परिश्रमाने २९ पैकी २८ मृतदेह सापडले व शोधमोहीम थांबवावी लागली. सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, मंत्री, सामाजिक संघटनांनी पाटणकडे धाव घेतली. मदतीचा हात दिला. ४२ गावांतील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामध्ये दोन हजार ५०० महिला, एक हजार ९२५ पुरुष व ९७९ लहान मुलांचा समावेश होता.

धोकादायक गावांचा सर्वे करून कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला. या कालावधीत लोकप्रतिनिधींनी बैठकांचा सपाटा लावला आणि बाधितांचे चार महिन्यांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणार, असे वातावरण तयार झाले. मात्र, आज नऊ महिन्यांच्या कालावधीत सुरुवातीला कोयना प्रकल्पाच्या जुन्या पडक्या शेडच्या ठिकाणी ढोकावळे व मिरगावमधील कुटुंबांना दिलेल्या घरांचा अपवाद वगळता इतर धोकादायक गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे अवस्थेत आहे. एक महिन्याचा कालावधी पावसाळा सुरू होण्यास शिल्लक आहे. मात्र, प्रशासनाने किंवा राज्य सरकारने धोकादायक अवस्थेत असलेल्या एकाही कुटुंबासाठी एकही निवारा शेड उभारलेले नाही. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासारखी भूस्‍खलनग्रस्तांची अवस्था होणार आहे.

बाधितांना सुरक्षित ठिकाणी निवारा देण्याचे आव्हान

अतिवृष्टी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या गावांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसनासाठी किती बैठका झाल्या, याची मोजदाद करता येणार नाही. परंतु, त्यानंतर भूस्‍खलनग्रस्तांची कोणालाही साधी आठवण नसावी, ही शोकांतिका आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बाधितांना सुरक्षित ठिकाणी निवारा हे दिवास्वप्न राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT