सातारा

ख्रिस्ती बांधवांनाे! प्रार्थनेला चाललात? जिल्हाधिका-यांची सूचना वाचा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : नाताळ सणासाठी शहरातील विविध चर्चमध्ये भव्य दिव्य सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुगे, पताका, विद्युत दिव्यांच्या माळा, आकर्षक आणि कलात्मक वस्तूंच्या साह्याने चर्चच्या जुन्या इमारतींना उजाळा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सण, उत्सव साजरे करण्यासाठी शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करूनच नाताळ सण साजरा करणार असल्याची माहिती चर्चच्या वतीने देण्यात आली.
 
शहरात टिळक मेमोरिअल, सेंट थॉमस, तसेच कॅथॉलिक अशी विविध चर्च आहेत. शहर आणि परिसरात दीड हजाराहून अधिक ख्रिश्‍चन कुटुंबे आहेत. विविध चर्चमध्ये दररोज प्रार्थना व इतर कार्यक्रम होतात. नाताळच्या काळात तर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या सर्व चर्च नाताळसाठी सज्ज झाली आहेत. परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच विद्युत दिव्यांच्या माळा सोडण्यात आल्या आहेत. काही चर्चमध्ये आतील भाग विविध कलात्मक वस्तूंच्या साह्याने सजविण्यात आला आहे. सेंट थॉमस चर्चमध्येही आकर्षक सजावट करण्यात आली आहेत. काही ठिकाणी चांदणीच्या प्रतिकृती करण्यात आल्या आहेत.

Inventor : मुलांनो, आता पालकांची चिंता सोडा! नागपुरातील युवकाने तयार केले आजाराची पूर्वसूचना देणारे ‘डोझी’ यंत्र

शहरातील चर्चना मोठी परंपरा आहे. इमारती ब्रिटिशकालीन आहेत. साधारण 1910 ते 1917 च्या सुमारास बांधण्यात आल्या आहेत. टिळक मेमोरिअल चर्चला दीडशेहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. सेंट थॉमस चर्चची इमारत उंच आणि भव्य असून, घडीव दगडाचे चुन्यात बांधकाम करण्यात आले आहे. आज (शुक्रवार) सर्व चर्चमध्ये प्रार्थना, प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सण, उत्सव साजरे करण्यासाठी शासनाने जे नियम अटी घातल्या आहेत. त्याचे पालन करूनच आज (शुक्रवार) नाताळ साजरा करणार असल्याची माहिती अभय भोरे यांनी दिली. ख्रिस्त नववर्षाच्या स्वागतासाठी येथील टिळक मेमोरिअल चर्च सज्ज झाले आहे. या चर्चची साताऱ्यात तीन नोव्हेंबर 1855 रोजी स्थापना झाली. 

चर्चमध्ये प्रार्थनेस 50 जणांच्या उपस्थितीचे बंधन : जिल्हाधिकारी
 
ख्रिश्‍चन बांधवांनी नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करून चर्चमध्ये केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत प्रार्थना सभेचे आयोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

अहाे, ऐकलत का! स्वस्तात घर खरेदी झाली शक्य

नाताळ सणानिमित्त जिल्ह्यात जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला आहे. त्यासोबतच काही अटी शर्तींवर नाताळ सण साजरा करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकात म्हटले, की नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये 50 लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर प्रत्येकाने करावा. चर्चमध्ये प्रभू येशू यांचे स्तुती गीत गाण्यासाठी दहा गायकांचा समावेश करावा. चर्चच्या बाहेर दुकाने, स्टॉल लावण्यात येऊ नयेत. 60 वर्षांवरील वृद्ध व दहा वर्षांखालील मुले यांनी घराबाहेर जाणे टाळावे. त्यांच्यासाठी ऑनलाइन प्रार्थनेची व्यवस्था करावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सर्वांनी नाताळ सण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीनेच साजरा करावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT