सातारा

रिक्षासाठी घेतलेलं कर्ज त्वरित माफ करा; रिक्षा युनियनचा आक्रमक पवित्रा

उमेश बांबरे

सातारा : रिक्षासाठी घेतलेले कर्ज माफ करावे किंवा त्यावरील व्याज माफ करून त्यास मुदतवाढ द्यावी, पासिंगसाठी द्यावा लागणारा सर्व प्रकारचा कर एक वर्षासाठी माफ करावा, रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्यास त्याचे रिक्षावरील कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी सातारा शहर रिक्षा युनियनने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. वंचित बहुजन आघाडी, तसेच अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाशी संलग्न रिक्षा युनियन संघटनेचे शहराध्यक्ष शशिकांत खरात, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. 

या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले, की कोरोनाच्या संकटात केलेल्या लॉकडाउनमुळे रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे जीवनमरणाचा प्रश्‍न उभा असताना दुसरीकडे रिक्षा व्यवसायासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या बॅंका, सोसायट्या, सहकारी बॅंका, तसेच फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला असून, काही ठिकाणी गाड्या जप्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे जीवनमान पूर्णपणे कोलमडले आहे. 

या रिक्षा व्यावसायिकांना आता शासनाच्या मदतीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे शासनाने मदतीचा हात देताना लॉकडाउनच्या काळातील सर्व वित्त संस्थांच्या कर्जाचे थकीत हप्ते शासनाने माफ करावेत. थकीत कर्जावरील एक वर्षाचे व्याज माफ करून कर्जास मुदतवाढ द्यावी. सध्या लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. त्यामुळे लोक भीतीपोटी रिक्षातून प्रवास टाळत आहेत. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे.

त्यामुळे रिक्षा पासिंगसाठी असलेला सर्व कर भरणा एक वर्षासाठी माफ करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्याकडे तातडीने लक्ष देऊन त्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. या वेळी विठ्ठल रेवाळे, गौतम भोसले, अशोक गायकवाड, मज्जित आगा, अजित आवाड, गोरखनाथ बावाने, अमोल लंकेश्‍वर, अमोल बैले, सत्यवान कांबळे, राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत जाधव, भानुदास खंडझोडे आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'खाकी अंगावर घातली की जात-धर्म विसरा'; अकोला दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्याचे Supreme Court ने का दिले आदेश?

Beed Crime: माजी उपसरपंच प्रकरणात धक्कादायक वळण; बार्शी तालुक्यात कारमध्ये मृतदेह सापडला, नातेवाइकांचा संशय

Mumbai Pollution: धूळ नियंत्रणासाठी कठोर नियमावली, हिवाळ्यापूर्वी लागू करण्याचा प्रयत्न

iPhone Air : भारतीय भिडूने बनवला कागदासारखा पातळ iPhone Air, कोण आहे अबिदुर चौधरी?

Jagdeep Dhankhar : राजीनाम्यानंतर अखेर ५३ दिवसांनी दिसले जगदीप धनखड; उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती...

SCROLL FOR NEXT