सातारा

वाह, क्या बात है! स्वतः रिक्षा चालकांनीच बुजवले रस्त्यावरचे खड्डे

Balkrishna Madhale

सातारा : सातारा-कोरेगाव स्त्यावर खावली पर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. छोटे-मोठे अपघात होत आहेत. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वतः रिक्षा चालकांनी या मार्गावरील खड्डे भरून घेत, रस्ता मजबुत केला आहे. या त्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातारा-कोरेगाव रस्त्यावर संगम माहुली पुलाच्या दोन्ही बाजूला कृष्णा-वेण्णा नदी वाहते पूल अरूंद असल्याने वाहनचालकांना पुलावरून गाडी चालवताना कसरत करावी लागते. दुर्दैवाने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली कोसळली तर गंभीर अपघात होण्याची भीती आहे. अशा घटना यापूर्वी घडल्या असून पुलाच्या धोकादायक वळणामुळे दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत चालली आहे. तसेच सातारापासून खावली पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. 

सातारा-पंढरपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. गाड्यांचे अपघात होताहेत. नुकतेच संगम माहुली गावातील रिक्षाचालक स्टाॅप संघटना युवकांनी येथील खड्डे भरले व रस्ता मजबुत केला. यावेळी उध्दव सावंत, प्रकाश नेवशे, अमोल कोळपे, चंद्रकात घोरपडे, सुनिल सुतार, नितीन घोरपडे, लखन सुपेकर, राहुल पडवळ यांनी एकत्र येवून रस्त्यावरचे खड्डे मुरूम टाकून भरून घेतले. या त्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Premanand Maharaj: विराट-अनुष्कासारखं प्रेमानंद महाराजांना भेटायचंय? जाणून घ्या खर्च किती

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Latest Marathi News Live Update : निवडणूक निकाल जवळ येताच शिंदे गट व भाजपाची धाकधूक वाढली; काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांची टीका

SCROLL FOR NEXT