सातारा ः श्वान आपल्या धन्याशी आणि दिलेल्या कर्तव्याशी प्रामाणिकच राहतात. हे पुन्हा एकदा सातारा पोलिसांच्या श्वान पथकातील "रिओ'ने सिद्ध केले असून, साप (ता. कोरोगाव) येथील पतसंस्थेतील चोरीतील चोरट्याचा नुकताच अचूक माग काढत आपल्या अचुकतेची चुणूक दाखविली.
रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साप येथे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेत नुकतीच चोरी झाली होती. चोरट्यांनी पतसंस्थेच्या कार्यालयातील 5500 रुपये आणि कागदपत्रे पळविली होती, तसेच तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतची माहिती रहिमतपूरचे सहायक पोलिस निरीक्षक बल्लाळ यांनी पोलिस नियंत्रण कक्षास कळविली.
सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष
त्यानुसार हवालदार जी. डी. मोरे, व्ही. एस. जाधव, व्ही. एस. निकम हे रिओ श्वानासह घटनास्थळी गेले. घटनास्थळी संशयित चोरट्याची गोधडी सापडली. रिओला गोधडीचा वास देण्यात आला. पतसंस्थेपासून जवळच झुडपात टाकलेली कटावणी सापडली.
गोधडीचा पुन्हा वास घेऊन रिओ साप बस स्थानकापासून पुढे साप- रहिमतपूर रस्त्यावरून पुढे जाऊन एका बंद घराजवळ थांबली. ते घर सचिन जनार्दन वाघमारे यांचे असल्याचे समजले. रिओने संशयित गुन्हेगाराच्या घरापर्यंत अचूक माग काढून पोलिसांना तपासात मोलाची मदत केली आहे.
कास, ठोसेघरला दिवाळीनंतर भेट देणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.