सातारा

खब-याने रितू खोखरांना केला फोन; दारू बाटल्यासह पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : चिमणगाव (ता. कोरेगाव) हद्दीतील साईसागर ढाब्याजवळ उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये बेकायदा, बिगरपरवाना, चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या सुमारे दोन हजार दारूच्या बाटल्यांसह रोख रक्कम, एक मोबाईल फोन व एक गाडी, असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांचे आरटीपीसी कॉन्स्टेबल इंद्रजित विलास भोसले यांनी फिर्याद दिली आहे. 

त्यात म्हटले आहे, की परिविक्षाधीन अधीक्षक खोखर यांनी फोनद्वारे कळवलेल्या ठिकाणी मी तसेच हवालदार जाधव, कॉन्स्टेबल मेश्राम व पंच, असे आम्ही काल रात्री पायी निघालो होतो. दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास चिमणगाव- बोरजाईवाडी रस्त्यालगतच्या साईसागर ढाब्याजवळ एक ओम्नी गाडी (एमएच 12 एएफ 5874) उभी होती. गाडीमध्ये चालक अरुण रामचंद्र जाधव (रा. महादेवनगर, कोरेगाव) व त्याच्या शेजारी उमेश एकनाथ जाधव (रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) बसले होते. 

डोंगरातून पायपीट करत अजून किती दिवस आम्ही शाळेत जायचे, कऱ्हाड आगाराच्या कारभारास विद्यार्थी वैतागले 

या गाडीमध्ये मधल्या सीटच्या मोकळ्या जागेत 66 हजार 720 रुपये किमतीच्या एकूण एक हजार 944 दारूच्या बाटल्या ठेवल्याचे आढळून आले. गाडीतील दोघांकडे विचारणा केली असता, दारूविक्री व वाहतुकीचा परवाना नसल्याचे या दोघांनीही सांगितले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन वरील वर्णनाच्या दारूच्या बाटल्या, रोख तीन हजार 680 रुपये, एक मोबाईल फोन व ओम्नी गाडी, असा एकूण एक लाख 70 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत.

उदयनराजेंनी केले पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अभिनंदन

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT