सातारा

पुलांची उंची ठरतेय प्रवाशांची डोकेदुखी; वाहतुकीचा होतोय खोळंबा

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील बहुतांशी राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, तसेच वाड्यावस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील बहुतांशी पूल पूर आल्यानंतर पाण्याखाली जातात. त्यामुळे तासन्‌तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. 

माणमध्ये जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्या मानाने पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षीही पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे अनेकदा ओढे, नाले यासह माणगंगा नदीला पूर येत आहेत. पूर आल्यानंतर काही वेळातच कमी उंची असलेले पूल पाण्याखाली जातात. पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे लगेचच वाहतूक ठप्प होते. पूर ओसरायची तासन्‌तास वाट पाहवी लागत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. 

दहिवडी-मलवडी-कुळकजाई, दहिवडी-राणंद-मार्डी, दहिवडी-पिंगळी बुद्रुक, दहिवडी-नरवणे-वडजल, म्हसवड परिसर, वरकुटे मलवडी परिसर या सर्वच मुख्य, तसेच ग्राम रस्त्यांवर कमी अधिक प्रमाणात छोटे-मोठे पूल आहेत. यातील अपवाद वगळता सर्वच पूल जुने व कमी उंचीचे आहेत. बहुतेक ठिकाणी सिमेंटच्या नळ्या वापरल्या आहेत. वाहून येणारा गाळ, वाळूमुळे, तसेच लाकडी ओंडक्‍यांमुळे या नळ्या मुजतात अथवा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होतो. त्यामुळे पाणी नळ्यांमधून जाण्याऐवजी पुलांवरून वाहते. मोठा पाऊस झाला, की थेट पुलांवरूनच पुराचे पाणी वाहण्यास सुरुवात होते. 

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, तसेच नदीला आलेल्या पुरामुळे दहिवडी-कुळकजाई रस्त्यावरील तब्बल सहा ते सात पूल, मलवडी-परकंदी रस्त्यावरील दोन पूल, आंधळी गावात जाणारे दोन पूल, राणंद येथील, मार्डी-भालवडी रस्त्यावरील, पिंगळी बुद्रुक जवळील पूल असे अनेक पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

Latest Marathi Update : नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

SCROLL FOR NEXT