सातारा

लवकरच महावितरण कार्यालयास टाळे ठोकणार; अशाेक गायकवाडांचा इशारा

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना काळात टाळेबंदी असूनही शेतकरी, छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना आलेली भरमसाट वीजबिले माफ केली नाहीत तर महावितरण कंपनी कार्यालयास टाळे ठोका आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी नुकताच दिला.
 
गायकवाड म्हणाले, ""मुंबई आयआयटी या देशपातळीवर नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेने सर्वेक्षण करून महावितरणचा फसव्या वीजबिलांचा घोटाळा बाहेर काढला आहे. त्यातून अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. राज्यात दोन कोटी वीज ग्राहक व 43 लाख कृषी पंपधारक आहेत. त्यांच्या बिलात घोटाळा झाला आहे. भरमसाट वीजबिले माथ्यावर मारली जात आहेत. ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत बिले माफ करण्याचे जाहीर केले होते. त्याचे पुढे काय झाले माहीत नाही.'' महावितरणने लवकरात लवकर वीजबिल माफ न केल्यास महावितरण कंपनीलाच टाळे ठोकणार, असा इशाराही त्यांनी दिला.

बंद असलेल्या शाळा तातडीने सुरू करा; शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा व्यवस्थापनाला सूचना

या वेळी आप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे, जयवंत वीरकायदे, सिध्दार्थ कांबळे, उत्तम कांबळे, युवराज काटरे, राजू लादे, अजित गायकवाड, किशोर गालफाडे, सचिन वायदंडे, वैभव गायकवाड, आदित्य गायकवाड, अशोक मदने, एकनाथ रोकडे, जग्गी कांबळे आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Restrictions: पुण्यात ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; १४ दिवस कलम ३७ लागू, कधीपासून आणि का? जाणून घ्या...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT