RTE Admission News sakal
सातारा

सातारा : RTE प्रवेश प्रक्रियेकडे पाठ

दोन दिवस बाकी, १०६१ प्रवेश निश्‍चित

प्रशांत घाडगे -@ghadgepd

सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थंडावल्याचे दिसून येत आहे. प्रवेश प्रक्रियेला २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देऊनही जिल्ह्यात केवळ एक हजार ६१ प्रवेश निश्‍चित झाले असून पहिल्या फेरीत अजूनही ६४० जागा शिल्लक आहेत. यासारखीच परिस्थितीत राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांत असल्याने या प्रक्रियेला आणखीन मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

राज्यभरात यंदा एक लाख एक हजार ९०६ जागा उपलब्ध असून त्यासाठी ९० हजार ६८५ जागांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामधील आतापर्यंत केवळ २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. सातारा जिल्ह्यातही २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी २२७ शाळांची नोंदणी झाली असून, एकूण तीन हजार २६१ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आले आहेत. त्यामध्ये यंदा आरटीईअंतर्गत जिल्ह्यात एक हजार ९३१ जागा भरण्यात येणार असून त्यामधील पहिल्या राउंडमध्ये एक हजार ७०१ विद्यार्थ्यांची निवड यादी लावण्यात आली होती. त्यातील आतापर्यंत एक हजार ६१ जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे.

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत ३० मार्चला काढण्यात आली. त्यानंतर चार एप्रिलला

आरटीईच्या पोर्टलवर निवड यादी व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. या विद्यार्थ्यांना २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यासंदर्भात मुदत देण्यात आली होती. मात्र, यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण संचालनालयाला प्रवेश

घेण्यासाठी आणखीन मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT