सातारा

ग्रामीण भागात एसटीला अद्याप 'ब्रेक'; लांब पल्ल्याच्या गाड्या सुसाट

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्‍य घेऊन ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवन वाहिनी ठरलेल्या लालपरीची (एसटी) चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउननंतर लालपरीची चाके जाग्यावर थांबली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर करण्यासह विविध उपाययोजना करत राज्यात परिवहन महामंडळाची बससेवा बंद केली. तेव्हापासून थांबलेली चाके तब्बल सहा ते सात महिने जागेवरच आहेत. शासनाने आता अनलॉक करत बंद ठेवण्यात आलेल्या सुविधा हळूहळू सुरू केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने आपली बससेवा शहरी भागात सुरू केली; परंतु ग्रामीण भागात अद्याप सुरू केलेली नाही. ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्धांना लालपरीची प्रकर्षाने जाणीव होत आहे. ग्रामीण भागातील बससेवा सुरू नसल्याने नागरिकांना अवैध वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे, तसेच दवाखाना, कार्यालयीन कामासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रवाशाचे हाल होत आहेत. सध्या सणासुधीचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागले आहे. 

ग्रामीण भागात अजूनही वाहतुकीच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, आबालवृद्ध, प्रवाशांना ये- जा करण्यासाठी परिवहन महामंडळाचा आधार मिळतो. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर शहरी भागात राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरू करण्यात आली; परंतु ग्रामीण भागात अजूनही ही बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 
-अर्जुन अवघडे, वावरहिरे, ता. माण 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT