Tiger Nails esakal
सातारा

कर्नाटकसह तमिळनाडूत वाघ, बिबट्याच्या नख्यांची विक्री

विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : वन विभागाच्या (Forest Department) अटकेतील संशयितांनी वाघासह बिबट्याची नखे विकण्यासाठी सोशल मीडियाचा (Social Media) वापर केला आहे. कर्नाटकसहीत (Karnataka) तमिळनाडूत (Tamil Nadu) नखांच्या (Tiger Nails) विक्रीचे प्रयत्न त्यांनी केल्याची खात्रीशीर माहिती वन विभागाला मिळाली आहे. त्यादृष्टीने तपासासाठी त्या भागात पथकेही रवाना झाली आहेत. नख्यांच्या तस्करीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे.

कर्नाटकसहीत तमिळनाडूत नखांच्या विक्रीचे प्रयत्न त्यांनी केल्याची खात्रीशीर माहिती वन विभागाला मिळाली आहे.

शहरातील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्याच्या नखांची (Leopard Nails) विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाने अटक केली. त्या दोघांकडून ११ नखे जप्त झाली आहेत. दिनेश बाबूलाल रावल (वय ३८, रा. सोमवार पेठ, सातारा) व अनुप अरुण रेवणकर (वय ३६, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. वन विभाग, वन्य जीव विभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोतर्फे संयुक्त कारवाई झाली. दोघांकडे सापडलेल्या वाघनखांची बाजारभावाप्रमाणे किंमत कित्येक लाखांत आहे. वन विभागाला त्यांचा आंतरराज्य टोळीशी संबंध असल्याची खात्री होऊ लागली आहे, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नख्या विकण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे वनखात्याच्या हाती लागले आहेत. त्या दृष्टीने वन विभाग तपास करत आहेत.

त्या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्नाटक, तमिळनाडूत नख्यांच्या विक्रीचा प्रयत्न केला आहे. त्या भागातील अन्य टोळ्यांशी त्यांचा कितपत संबंध आहेत, याची पडताळणी सुरू आहे. वन व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी संयुक्त तपास करत आहेत. त्यादृष्टीने माहिती घेण्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. या संशयितांकडून नख्यांचे लॉकेट खरेदी केले असेल तर ते त्यांनी आणून द्यावे, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT