सातारा

जिल्ह्यातील सलून व्यवसाय आजपासून आठ दिवस बंद : नाभिक महामंडळाचा निर्णय

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने आजपासून ८ दिवस सलून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ता. सात पासून ते  ता. १५ पर्यंत सलून व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी  दिली. 

याबाबत सपकाळ म्हणाले, कोरोनाची साखळी तुटण्यासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी आणि प्रशासनाच्या मदतीसाठी आपले कर्तव्य म्हणून आम्ही एक जबाबदार सातारा जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधव व सुज्ञ नागरिक म्हणून या कोरोना महामारीच्या लढ्याला आपला हातभार म्हणून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

सातारा : स्वत:हून होम आयसोलेशनचा निर्णय आला अंगलट
         
सध्या जिल्ह्यात रोजच कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील प्रशासनाकडून कोरोना साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने काही जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे प्रकार ही घडले आहेत. या अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने हा स्वयंस्फूर्तीने हा बंद पुकारला आहे. 

भात पिकाच्या बियाण्यात भेसळ, रेठऱ्यातील शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे
         
शासनाकडून काही नियम देऊन सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, सध्याच्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसाय आठ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय नाभिक समाजाने घेतला आहे. सातारा शहरातील व तालुक्यातील सर्व सलून व्यावसायिकांनी आजपासून आपले व्यवसाय बंद करण्याच्या सूचना वरून दिल्या आहेत. त्या प्रमाणे सातारा व तालुक्यातील सलून व्यवसाय आठ दिवसांसाठी बंद ठेवली जाणार असल्याची माहिती सातारा शहराध्यक्ष लक्ष्मण जाधव व तालुकाध्यक्ष पांडूरंग राऊत यांनी दिली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT