Sangali esakal
सातारा

Sangali : एसटी बसचे तिकीट आता यूपीआय क्यूआर कोडद्वारे

१६०० अॅन्ड्रॉईड ईटीआय मशीन; आरक्षणही शक्य

सकाळ डिजिटल टीम

सांगली : राज्य परिवहन महामंडळात नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशीन सर्व आगारांत कार्यान्वित केल्या आहेत. सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यात येत आहे. एस. टी. महामंडळातही कॅशलेस सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. सांगली जिल्ह्यात कॅशलेससाठी नव्याने १६०० नवीन मशीन आल्या आहेत. त्याचा प्रवाशांसाठी वापरही सुरू झालेला आहे. ‘यूपीआय क्यूआर कोड''द्वारे पैसे घेण्याची कार्यपद्धती सुरू झालेली आहे. प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत. भविष्यात आरक्षणासही विविध लाभ देण्याचा महामंडळाचा विचार आहे.

परिवहन महामंडळाकडून पुढील टप्प्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. सद्यःस्थितीत वाहकाद्वारे क्यूआर कोडमार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपद्धती समवेत जोडण्यात येत आहे. व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व अन्य मोबाईलद्वारे ८८००६८८००६ क्रमांकास संपर्क करावा. ई-मेल wecare@aritelbank.com येथे संपर्क करावा.

एसटी महामंडळाच्या बससेवेची महाराष्ट्राच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका आहे. सर्वसामान्यांपासून सर्वचजण बसने प्रवास करत असतात. अनेकदा सुट्या पैशांचा प्रश्‍न नेहमीचाच निर्माण होतो. ते टाळण्यासाठी तसेच सध्या मोबाईलद्वारे ऑनलाइन व्यवहार वाढल्यामुळे या सेवेची अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे.

पेमेंटचे सर्व पर्याय

एसटी महामंडळाकडून लाँच केलेल्या नव्या अ‍ॅपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डवरूनच नाही, तर मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या गूगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे. या अ‍ॅपवर प्रवाशांना त्यांनी तिकिटे आरक्षित केलेली बस नेमकी कुठं आहे, हेही तपासता येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहत राहणं बंद होणार आहे. तसेच प्रवाशांना आपली कामं करून बसच्या वेळेत उपस्थित राहता येईल.

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी तिकीट उपलब्ध करुन देण्यासाठी यूपीआय क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या अत्यल्प प्रतिसाद आहे. भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल. आरक्षणासह आणखी काही सुविधा दिल्या जातील. प्रवाशांच्या अपेक्षांना महामंडळ प्राधान्याने बदल करीत आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT