Sanjay Bhosale criticize Jaykumar Gore over zilla parishad panchayat samiti election satara politics sakal
सातारा

Satara News : निवडणूकांच्या तोंडावर आमदार गोरे यांचा स्टंट; ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची टीका

आमदार गोरे यांनी कित्येक स्थानिक निवडणूकांमध्ये या भागातील गावागावात जाऊन अगणित आश्वासने दिली

रुपेश कदम ः सकाळ वृत्तसेवा

आमदार गोरे यांनी कित्येक स्थानिक निवडणूकांमध्ये या भागातील गावागावात जाऊन अगणित आश्वासने दिली

दहिवडी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मुदत संपून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदा या सर्वच निवडणूकांचे बिगूल कोणत्या क्षणी वाजेल याची कल्पना असणार्‍या आमदार जयकुमार गोरे यांच्या मंत्रालयामधील बैठकांची लगबग व कोट्यावधी निधी मंजूरीच्या घोषणा हा नेहमीप्रमाणे केलेला स्टंट असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केला आहे.

आज माण-खटाव, फलटणवर निधीचा वर्षाव अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्या पार्श्‍वभूमीवर श्री भोसले यांनी प्रसिध्दीपत्रक जाहीर केले. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, आमदार जयकुमार गोरे यांनी उपभोगलेल्या सत्ता काळात तसेच आमदारकीच्या साडेबारा वर्षांच्या कार्यकाळात ते जिहे-कटापूर योजनेला पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. उत्तर माणचा बिजवडी परिसर व कारखेल पर्यंतच्या कायम वंचित, दुष्काळी एवढेच नव्हे तर कोणत्याच योजनेत नसलेल्या या भागाला पाणी वाटपात साधे समाविष्ट देखील करु शकले नाहीत ही वस्तुस्थिती व मोठी शोकांतिका आहे?

आमदार गोरे यांनी कित्येक स्थानिक निवडणूकांमध्ये या भागातील गावागावात जाऊन अगणित आश्वासने दिली. आज पुन्हा तेच करताना भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार गोरे काडीमात्र थकत नाहीत. ही भोळ्याभाबड्या जनतेची क्रूर चेष्ठा आहे. जनतेने भरभरुन दिले असताना 'देर आये, लेकिन दुरुस्त आये' या उक्तीप्रमाणे जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नांचे भांडवल न करता जबाबदारीने काम करावे असा सल्ला संजय भोसले यांनी आमदार गोरे यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT