26/11 Attack Satara
सातारा

26/11 Attack : हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाचा वनवास संपणार कधी?

जावळीकरांना प्रश्‍न; चौदा वर्षांत राज्यात चार सरकारे येऊन गेली, तरीही प्रस्ताव लालफितीत

संदीप गाडवे

केळघर : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात केवळ हातातील काठीच्या साहाय्याने क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून देत प्राणांची आहुती देणाऱ्या जावळी तालुक्यातील केडंबे गावातील सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटणार कधी? याचे कोडे तालुक्यातील जनतेला पडले आहे.

 राज्यात चार सरकारे आली अन् गेली. मात्र, कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा चेहरा जगापुढे आणणाऱ्या जावळीच्या सुपुत्राचे स्मारक लालफितीत अडकले आहे. स्मारकासाठी सुरुवातीला एक कोटी रुपये निधी अपेक्षित होता. आता स्मारकाचा खर्च मात्र वाढलेला आहे. गेल्या १४ वर्षांपासून या स्मारकाचे काम रखडल्याने शासन व प्रशासन हुतात्म्यांच्या हौतात्म्यप्रती किती संवेदनशील आहे, हे दिसून येते.

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाचा गौरव जगभरातून झाला. अगदी देशाच्या संसदेतही लालकृष्ण अडवानी यांनी ओंबळे यांच्या पराक्रमाचा आवर्जून उल्लेख केला. केंद्र सरकारने हुतात्मा ओंबळे यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित केले. मात्र, ज्या प्रमाणे श्री रामाने १४ वर्षे वनवास भोगला, त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न १४ वर्ष रखडला आहे. हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकासाठी एक हेक्टर जागा ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली आहे. जागेचा प्रश्न महसूल विभागाकडून मार्गी लागला आहे. या जागेचा सातबारा उतारा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देखील झाला आहे. या स्मारकासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी आमदार भोसले यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. हुतात्मा ओंबळे यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तिदायी ठरावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष...

जावळी तालुक्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून हुतात्मा ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. स्मारकासाठी लागेल तेवढा निधी सरकार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिली. पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार या स्मारकाचा प्रश्नासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. स्मारकाचा प्रस्ताव पुणे येथील बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात आहे. लवकरच या स्मारकाचे काम प्रत्यक्ष सुरू होऊन हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT