satara muncipality sakal media
सातारा

सातारा : अर्ध्या तासातच ३९७ विषय मंजूर

सातारा पालिका स्‍थायी समितीची सभा; अजेंड्यावरील तीन विषय रद्द

सकाळ वृत्तसेवा

सातारा पालिका स्‍थायी समितीची सभा; अजेंड्यावरील तीन विषय रद्द

सातारा : सातारा पालिकेच्‍या आज झालेल्‍या स्‍थायी समितीच्‍या सभेत अर्धा तासात अजेंड्यावरील ३९७ विषयांना एकमताने मंजुरी देण्‍यात आली. सभेदरम्‍यान प्रभाग क्रमांक १५ मधील रस्‍त्‍यांचे दोन, तर सदरबझार येथे आयलँड उभारण्‍याचा एक विषय रद्द करण्‍यात आला. कार्यकाळ पूर्ण होण्‍यास काही दिवस बाकी असतानाच आजच्‍या स्‍थायीच्‍या सभेत सातारा विकास आघाडीने निवडणुकीतील मतांची पेरणी केल्‍याचे दिसून येत आहे.

पालिकेचा कार्यकाळ येत्‍या २२ तारखेला संपुष्‍टात येत आहे. या अगोदर शहरातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी स्‍थायी समितीच्‍या सभेचे आयोजन आज पालिकेच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. या सभेपुढे ४०० विषय मंजुरीसाठी ठेवण्‍यात आले होते. सकाळी अकरा वाजता नगराध्‍यक्षा माधवी कदम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू झाले. सभेसाठी मुख्‍याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्‍त मुख्‍याधिकारी पराग कोडगुले, उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, विरोधी पक्षनेता अशोक मोने, नगरसेवक ॲड. दत्ता बनकर, पक्षप्रतोद निशांत पाटील, स्‍नेहा नलावडे, सीता हादगे, अनिता घोरपडे, रजनी जेधे उपस्‍थित होते.

सभाधिकारी अतुल दिसले यांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू केल्‍यानंतर ॲड. बनकर यांनी विषयपत्रिकेतील महत्त्‍वाच्‍या विषयांचे वाचन करण्‍याची सूचना करत उपस्‍थित सदस्‍यांना अजेंड्यांविषयी कोणास काही मत मांडायचे आहे का, असे विचारले. यावर श्री. मोने यांनी शहापूर पाणी योजनेशी निगडित असणाऱ्या चार विषयांसाठी निधी उपलब्‍ध आहे का, अशी विचारणा केली. त्‍या कामांसाठी निधी उपलब्‍ध आहे, असे उत्तर माधवी कदम यांनी दिल्‍यानंतर स्‍थायीचे कामकाज पुढे सुरू करण्‍यात आले. या सभेदरम्‍यान प्रभाग क्रमांक १५ मधील रस्‍त्‍याचे दोन विषय निधी नसल्‍याच्‍या कारणास्‍तव, तसेच सदरबझारमधील सुमित्राराजे उद्यानासमोरील चौकात उभारण्यात येणारा आयलँडचा विषय रद्द करण्‍यात आला. अर्धा तास चाललेल्‍या स्‍थायीच्‍या सभेत ३९७ विषयांना मंजुरी देण्‍यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी सर्वात मोठी खुशखबर! १३ एप्रिलपासून राम मंदिर परिसरातील सर्व १८ मंदिरांचे दर्शन सुरू; असा मिळवा 'स्पेशल पास'

Panchang 12 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाल अन् दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 12 एप्रिल 2026

Quick & Healthy Weekend Breakfast: रविवारच्या स्लो मॉर्निंगसाठी परफेक्ट; १० मिनिटांत बनवा हेल्दी बनाना-ओट्स पॅनकेक्स

Tamilnadu election row: रणधुमाळीत ‘जननायकन’चा ‘पब्लिक शो’

SCROLL FOR NEXT