प्रतापगड साखर कारखाना sakal
सातारा

सातारा: प्रतापगड कारखान्यासाठी २१ जागांसाठी ८३ अर्ज दाखल

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

महेश बारटक्के

कुडाळ: सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

प्रतापगड साखर कारखाना निवडणुकीसाठी ता. चार फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार आजच्या शेवटच्या दिवशी कारखाना गट, प्रतापगड बचाव पॅनेल व अन्य अपक्ष यांच्याकडून दाखल झालेल्या अर्जानुसार २१ जागांसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने २८ तारखेपर्यंत किती अर्ज शिल्लक राहणार यावर निवडणूक बिनविरोध होणार का रंगतदार होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

कुडाळ गटातील तीन जागांसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, खर्शी सायगाव गटातून तीन जागांसाठी एकूण १३ उमेदवारी अर्ज, हुमगाव गटातून ३ जागांसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज, तर मेढा गटातून ३ जागांसाठी एकूण १४ उमेदवारी अर्ज, महाबळेश्वर गटातून ३ जागांसाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थेतून एका जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज, महिला राखीव गटातून २ जागांसाठी एकूण ५ उमेदवारी अर्ज, तर अनुसूचित जाती व जमाती राखीव गटातून एका जागेसाठी एकूण ५ अर्ज, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव गटातून एका जागेसाठी एकूण चार उमेदवारी अर्ज, तर इतर मागास प्रवर्गातून एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT