Satara: कऱ्हाड बाजार समितीचे उत्पन्न ८६ लाखांनी वाढले!  sakal
सातारा

Satara: कऱ्हाड बाजार समितीचे उत्पन्न ८६ लाखांनी वाढले!

विजयकुमार कदमांच्या काळात विक्रमी उलाढाल, एक कोटी ५६ लाखांवर नफा

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

Karad| पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मोठे उत्पन्न असणारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील बाजार समितीच्या विजयकुमार कदम यांच्या सभापतीकाळात बाजार समितीत एक कोटी ५४ लाख ६९ हजार ७१६ रुपयांची विकास कामे झाली आहेत. त्याचबरोबर बाजार समितीस चार कोटी ५७ लाख ८४ हजार उत्पन्न मिळाले असुन खर्च वजा जाता एक कोटी ५६ लाख ६५ हजार रुपये नफा मिळाला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा ८६ लाख रुपयांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढले आहे.

कऱ्हाड येथील बाजार समितीत गुळ, सोयाबीन, शेंगासह व अन्य शेतमालांची मोठी आवक होवुन आर्थिक उलाढालही मोठी होते. शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीत अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांची सत्ता आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विजयासाठी मोठे कष्ट घेतलेले अॅड. उंडाळकर गटाचे युवा कार्यकर्ते विजयकुमार कदम यांना पहिल्यांदा सभापती पदी संधी देण्यात आली होती.

तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांना संधी देण्यात आली. सभापती कदम यांच्या काळात बाजार समिती परिसरातील (कै) शामराव पाटील यांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण करणे, बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांची कमान उभारणे, बाजार समिती इमारतीचे नुतणीकरण, (कै) शामराव पाटील फळे, फुले, भाजीपाला मार्केटमध्ये सौरउर्जा प्रकल्पाचे काम, स्वच्छतागृहांची उभारणी, समितीच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आदी एक कोटी ५४ लाख ६९ हजार ७१६ रुपयांची विकास कामे झाली आहेत.

त्याचबरोबर बाजार समितीच्या नियमीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करणे आणि बाजार समितीच्या संरक्षक भिंतीबाबात सभापती कदम यांनी ठोस भुमिका घेवुन कार्यवाही केली. बाजार समितीस चार कोटी ५७ लाख ८४ हजार उत्पन्न मिळाले असुन खर्च वजा जाता एक कोटी ५६ लाख ६५ हजार रुपये नफा मिळाला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा ८६ लाख रुपयांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढले आहे.

कऱ्हाड बाजार समितीत आमचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथअवीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करता आले. एक कोटी ५४ लाख ६९ हजार ७१६ रुपयांची विकास कामे करुन बाजार समितीचे ८६ लाखांनी उत्पन्न वाढवले आहे. 

विजयकुमार कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT