सातारा : कऱ्हाडात राजकीय साखर पेरणीला गती sakal
सातारा

सातारा : कऱ्हाडात राजकीय साखर पेरणीला गती

फराळाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संपर्क; व्यक्‍तिगत शुभेच्छांवरही भर

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : दिवाळीच्या फटाक्यांच्‍या आतीषबाजीचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच कऱ्हाडला दिवाळी फराळाच्या निमित्ताने राजकीय आतीषबाजी सुरू झाली आहे. आमदार पृथ्वीराज गटाने फराळाच्या निमिताने कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याचे नियोजन केले आहे. लोकशाही आघाडीतर्फे अनेक ठिकाणी साखर वाटून राजकीय पेरणी सुरू आहे. जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनीही व्यक्‍तिगत गाठीभेटी घेऊन शुभेच्छा देण्यावर भर दिला आहे. माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याही गटाने समर्थकांना बोलावून कार्यालयात फराळाचा आस्वाद देत गटबांधणीचा प्रयत्न केला आहे.

दिवाळीनिमित्त होणाऱ्या पेरणीत अनेक राजकीय गणितांची बेरीज जुळवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिवाळीच्या पाडव्यापासून फराळाचा तडका राजकीय चर्चांना ऊत आणणारा ठरला आहे. राजकीय व्यासपीठाला मिळालेली फराळाची साथ अनेकांसाठी गोडव्यात रूपांतरित करणारी ठरणार का, ते येणारा काळच ठरविणार आहे. त्यामुळे तूर्त तरी राजकीय चर्चेला चांगलीच गती मिळाली आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावलेले माजी आमदार आनंदराव पाटील यांचाही गट दिवाळीच्या निमित्ताने सक्रीय होत विजयनगरच्या कार्यालयात दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले. त्यात जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांच्यासह त्यांच्या नगरसवेकांची उपस्थिती बरेच काही सांगून गेली. त्याशिवाय शहरातील गल्लीनिहाय आलेले पदाधिकारी कार्यकर्तेही दिसले. त्यामुळे तो गट पालिकेत सक्रिय होणारा असून तो गट यादव गटासोबत राहील, याचे संकेत मिळाले आहेत.

आमदार चव्हाण यांचाही गट दिवाळीच्या मुहूर्तावर गटबांधणीला लागल्याचे दिसते. फराळाच्या कार्यक्रमातून त्यांनी तसा संकेत दिला आहे. त्यालाही पालिका निवडणुकीचीच झालर आहे. त्याशिवाय राजकारणविरहित गब्बर ग्रुपने घेतलेल्या फराळाच्या कार्यक्रमालाही आमदार चव्हाण यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, लोकशाहीचे नेते सुभाष पाटील, जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांच्यासह आजी, माजी नगरसवेकांची उपस्थिती बरेच काही सांगून गेली. लोकशाही आघाडीने अनेकांना साखर वाटून केलेली राजकीय पेरणी अधिक चर्चेत आहेत. त्यासह यादव गटाचे नेते राजेंद्र यादव यांनी व्यक्‍तिगत संपर्क साधून शुभेच्छा देण्यावर दिलेला भरही चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT