Yavateshwar Ghat Accident esakal
सातारा

Satara : आधी वडिलांचं अपघाती निधन आणि आता 21 वर्षाची लेकही..; उदयनराजेंनी लिहिली हृदयद्रावक पोस्ट

गायत्रीच्या अचानक एक्झिटची सल मनात कायम टोचत राहील - उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

गायत्रीचे वडील दीपक आहेरराव यांचं काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. आता हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबीयांवर कोसळला आहे.

सातारा : यवतेश्वर घाटात (Yavateshwar Ghat Accident) शुक्रवारी रात्री दोन चारचाकी मोटारींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक युवती मृत झाली असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी जखमी अपघातग्रस्तांची सुटका केली. अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी (Satara Police) घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमीस साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

होंडा सिटी-क्रेटा गाडीची समोरासमोर धडक

होंडा सिटी आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला आहे. यामध्ये गायत्री आहेरराव या २१ वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला, तर कारची समोरासमोर धडक होवून चार ते पाचजण जखमी झाले. या अपघाताबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी दुख व्यक्त केलंय. मृत पावलेली गायत्री ही सातारा नगरपालिकेची कर्मचारी असल्याचे समजते.

यवतेश्वर घाटात भीषण अपघात

सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात झाला. क्रेटा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक होवून चार ते पाचजण जखमी झाले, तर पालिका कर्मचारी गायत्री आहेरराव या 21 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला.

गायत्रीचे वडील दीपक आहेरराव यांचं काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. आता हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबीयांवर कोसळला आहे. यवतेश्वर घाटात झालेला अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला.

काही वर्षांपूर्वी वडिलांचं अपघाती निधन, आता लेकीवरही काळाचा घाला..

या दुर्घटनेत मृत पावलेली गायत्री आहेरराव ही दीड वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेत कामास होती. दुर्देवी बाब म्हणजे सातारा नगरपालिकेचे कर्मचारी असलेले तिचे वडील दीपक आहेरराव हे देखील काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये मृत पावले होते. वडिलांनंतर लेकीवरही काळानं घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उदयनराजेंनी व्यक्त केलं दु:ख

आमचे निकटवर्तीय मित्र कै दीपक आहेरराव यांची सुकन्या गायत्री दीपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यू झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या, असं उदयनराजेंनी दु:ख व्यक्त केलंय. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या. श्री आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहे. दीपक यांचंही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं होतं आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबीयांवर आला. वहिनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टानं व जिद्दीनं सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली.

'तिच्या अचानक एक्झिटची सल मनात कायम टोचत राहील'

मात्र, आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही, आम्ही निशब्द आहोत. नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचं समाधान होतं. परंतु, हे समाधान अल्पकालावधीचं ठरलं. तिच्या अचानक एक्झिटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं उदयनराजेंनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: हवामान विभागाचा २१ ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT