Satara 
सातारा

एका पायावर घातली यशाला गवसणी..., बारावीत मिळवले घवघवीत यश

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : एका पायाने आयुष्याच्या प्रवासाची वाटचाल करणाऱ्या अजयने बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. रिक्षाचालक असलेल्या चुलत्यांच्या आधाराने गेली 12 वर्षे शिक्षणाचा पाया भक्कम करत त्याने हे नेत्रदीपक यश पटकावले आहे. 

ही कहाणी आहे एका दिव्यांग विद्यार्थ्याची. अजय कल्याण साळुंखे हे त्याचे नाव. तो सातारा तालुक्‍यातील देगाव येथील रहिवासी. गावातीलच धर्मवीर संभाजी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस महाविद्यालयात तो शिकतो. यंदा अजयने बारावीची परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षा निकालात अजयने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अजयच्या या यशाला आगळी किनार आहे. तो बालपणापासून दिव्यांग आहे.

आजवरच्या त्याच्या आयुष्याचा हा प्रवास त्याने एकाच पायावर केला आहे. नियतीने आयुष्याला अपुरेपण देऊनही अजयने कधीही हार पत्करलेली नाही. अभ्यासात तो हुशार आहेच. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीची जोडही त्याला यशाकडे घेऊन गेली आहे. त्याच्या या यशस्वी प्रवासात त्याचे चुलते धनाजी साळुंखे यांची भूमिकाही अत्यंत मोलाची ठरली आहे. ते स्वतः रिक्षाचालक, परिस्थिती बेताची. मात्र, गेल्या 12 वर्षांत ते अजयच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे अजयला शाळेत ने-आण करण्याचे काम त्यांनी अत्यंत जबाबदारीने, तितक्‍याच आनंदाने पार पाडले आहे. आपल्या यशाचे श्रेय तो चुलत्यांसह आपले वडील, आई अश्विनी, वर्गशिक्षिका सौ. चव्हाण, प्राचार्य सतीश जाधव यांनाही देतो. अजयच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. 

प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे गौरव 

अजयच्या या यशाबद्दल प्रहार संघटनेच्या वतीने त्याचा खास गौरव करण्यात आला. कार्यक्रमात चुलत्यांचाही आवर्जून सत्कार करण्यात आला. या वेळी देगावचे सरपंच गणेश रोकडे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंदा यांच्यासह तानाजी साळुंखे, स्वप्नील साळुंखे, नारायण साळुंखे, संदीप साळुंखे, रमेश कुंभार, विजय निकम आदींची उपस्थिती होती. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT