सातारा

Satara : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांवर कारवाई; गावठी पिस्टल, प्राण्याची शिंगे, वाघाची नखे जप्त

भद्रेश भाटे

वाई - बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी बावधन (ता. वाई) येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६,२०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी जप्त केला. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.२९) ही धडाकेबाज कारवाई केली. अविनाश मोहन पिसाळ (रा. बावधन नाका, ता. वाई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी जिल्ह्यातील

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील,अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले आहे.

दरम्यान बावधन नाका (वाई) येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी अविनाश मोहन पिसाळ याच्याकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल आहे तसेच त्यास शिकारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. देवकर यांना मिळाली. त्यांनी बातमीच्या अनुषंगाने सपोनि रविंद्र भोरे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने रविवारी (ता.२९) वाई वनविभागाच्या अधिकारी स्नेहल मगर व त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेवून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकला.

यावेळी पोलीस अभिलेखावरील अविनाश पिसाळ या गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६,२०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरुध्द वाई पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व वन्यजीव सरंक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री.देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे,

अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, अमृत कर्पे सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी सहभाग घेतला. या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Oath Ceremony : मुळशीचा पैलवान होणार देशाचा क्रीडा मंत्री?

Bus Conductor Viral Video: फुल ऑन ॲक्शन! कंडक्टर ठरला देवदूत, नेटकरी करतायेत कौतूक, पोलिसांनी केला सत्कार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर मोठी त्रुटी, एका विमानाचं उड्डाण होत असताना दुसऱ्या विमानाचं झालं लँडिंग

Munjya: 'मुंज्या'ची बॉक्स ऑफिसवर जादू; दोन दिवसात केली एवढी कमाई

Mumbai Crime News: धक्कादायक! आधी अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् नंतर लैगिंक अत्याचार; मुंबईतील घटना

SCROLL FOR NEXT