karad 
सातारा

अभिनेत्री अश्‍विनी महांगडेंनी साधला भिक्षेकऱ्यांशी संवाद

रविकांत बेलाेशे

भिलार (जि. सातारा) : "स्वराज्यरक्षक संभाजी" मालिकेतील राणू आक्कांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी समाजातील ऐक वंचित घटक असलेल्या भिक्षेकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्या हस्ते भिक्षेकरीगृहात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. 

सातारा येथील बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय पुरुष भिक्षेकरी गृहाला रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठाच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी भिक्षेकरीगृहातील प्रवेतांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या परिसराची पाहणी करतेवेळी संस्थेतील सोयी- सुविधा, वैद्यकीय सुविधा व स्वच्छतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. याप्रसंगी अश्विनी महांगडे यांच्या हस्ते संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, संस्थेचे अधीक्षक शिवाजी खुडे व कर्मचारी उपस्थित होते. 

आपण या लोकांना नकळत आपल्या आयुष्यातून काढून टाकले, पण खरे तर इथे येणार प्रत्येक माणूस हा समाजाचे चित्र आहे. प्रत्येकाची वेगळीच कथा आहे. हे खरोखरीच भयंकर असल्याचे सांगत अश्विनी महांगडे यांनी करून भिक्षेकरीगृहात येणाऱ्या सगळ्यांसाठीच इथे एवढे हात राबत आहेत. त्यांचेही त्यांनी आभार मानले. "मोरया प्रॉडकशन हाऊस' आणि "अंशुल प्रोडक्‍शन' लवकरच या लोकांची चित्तरकथा लोकांसमोर मांडेल, असेही त्यांनी सांगितले. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT