Satara
Satara 
सातारा

महाबळेश्वरात प्रवेशप्रक्रिया केंद्र सुरू, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीचा वेगळा उपक्रम

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वरसारख्या दुर्गम, डोंगराळ, कडेकपारीत व घनदाट जंगलात राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी स्वप्नवत असणारी "इंटरनेट व मोबाईल सेवा' ही अडसर ठरताना दिसत असून, यासाठी महाबळेश्वर पंचायत समितीने या मुलांना मदतीचा हात देण्यासाठी पंचायत समितीत खास प्रवेशप्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून, सर्व गावे घनदाट जंगल, डोंगरकपारीत व दुर्गम ठिकाणी वसली आहेत. बहुतांशी गावांत मोबाईल सेवा तर दुरापास्तच आहे. इंटरनेट सेवा तर येथील बऱ्याच लोकांच्या गावी माहीतच नाही. अशा परिस्थितीत दुर्गम भागातून मैलोन्‌ मैल पायपीट करीत तापोळा, वाघावळे, तळदेव, कुंभरोशी, मेटगुताड, राजपुरी, आपटी, गोगवे, भिलार, महाबळेश्वर, पाचगणी अशा ठिकाणी जावून विद्यार्थी शिक्षण घेतात. कोयना, कांदाटी, सोळशी विभागात तर अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. साधी मोबाईलची रेंज नाही तर इंटरनेट सेवा दूरच. त्यामुळे संगणक शिक्षण केवळ प्राथमिकच म्हणावे लागेल. 

सध्या कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शासनाने जाहीर केली. तालुक्‍यात 80 टक्के ठिकाणी रेंजअभावी या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी मोठी अडचण निर्माण झाली. ही अडचण ओळखून राजकारण व समाजकारणात दूरदृष्टीचा विचार करणारे पंचायत समितीचे उपसभापती संजूबाबा गायकवाड यांनी एक पाऊल पुढे येत महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने प्रवेशप्रक्रिया सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रवेशप्रक्रिया केंद्रामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुलभ झाली आहे. महाबळेश्वर येथे येऊन आपले प्रवेश विद्यार्थ्यांनी निश्‍चित करावेत, असे आवाहन या केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

""अनंत अडचणींचा सामना करत दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अपुरी इंटरनेट व मोबाईल रेंज यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. याला पर्याय म्हणून आम्ही हे प्रवेशप्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना शाखा निवडण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आपल्या उज्वल भवितव्यासाठी या केंद्राचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.'' 

-संजूबाबा गायकवाड, उपसभापती, महाबळेश्‍वर पंचायत समिती 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT