Satara 
सातारा

भात पिकाच्या बियाण्यात भेसळ, रेठऱ्यातील शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : वडगाव हवेली येथील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात घेतलेल्या भात पिकाच्या बियाण्यात फसवणूक झाली आहे. महाबीजकडून विक्री झालेल्या बियाण्यात भेसळ आढळल्याने उगवलेले पीकसुध्दा भेसळस्वरूपात दिसू लागल्याने संबंधित शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेता व कंपनीकडे धाव घेतली आहे. परंतु, त्यांना दोन्हींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ते चांगलेच संतप्त झाले आहेत. 

वडगाव हवेली येथील जयवंत आकाराम जगताप, अभय रामा संदे व सूर्यकांत भानुदास जगताप या शेतकऱ्यांनी यंदा खरिपातील भात पेरणीसाठी गावातील कृषी सेवा केंद्रातून महाबीजचे इंद्रायणी वाणाचे भात बियाणे खरेदी केले. पेरणीपूर्व मशागतीनंतर सदरच्या बियाण्याची पेरणी केली. उगवलेल्या पिकाची आंतरमशागत व खत व्यवस्थापन करून पिकही जोमात आणले आहे.

मध्यंतरी भातास पूरक पावसामुळे शेतात पुरेसा पाणीसाठा झाल्याने सदरचे पीक बहरले आहे. परंतु, त्या पिकात शेतकऱ्यांना 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भेसळीचे प्रमाण आढळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांची प्रत्येकी एक एकरप्रमाणे पेरणी झाली आहे. त्यांनी हा प्रकार संबंधित बियाणे विक्रेत्याच्या निदर्शनास आणून दिला. त्या विक्रेत्याने महाबीजच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. परंतु, संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्याच्या विनंतीस धुडकावून लावले. तसेच याबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन केले. यामुळे आता तक्रार कोणाकडे करायची? या विवंचनेत शेतकरी आहेत.

या शेतकऱ्यांव्यतिरिक्त अजूनही काही अल्पभूधारक शेतकऱ्यांची अशीच समस्या असण्याची शक्‍यता आहे. बियाण्यामध्ये झालेल्या फसवणुकीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT