Satara Latest Marathi News 
सातारा

माण-खटावात अवकाळीच्या भीतीने शेतकऱ्यांत धाकधूक; हातातोंडाशी आलेल्या पिकांवर पावसाचा घाव

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असल्यामुळे कुकुडवाड परिसरातील गावातील शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. रब्बीच्या हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या काढणीला जोम आलेला आहे. यातच अवकाळी पाऊस आल्यास नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्गात धास्ती वाढली आहे. 

कुकुडवाड परिसरातील गावामधून रब्बीच्या काढणीसह मळणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची शेतशिवारात ज्वारी, गहू, हरभरा पिकांची पसर पडून आहे. काही शेतकऱ्यांनी ढीग लावून ठेवलेले आहेत. गेल्या दोन- तीन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होऊन विजांचा कडकडाट होत आहे. काही ठिकाणी हलक्‍याफुलक्‍या सरी बरसत आहेत. यामुळे रात्री, अपरात्री शेतकरी ताडपत्री घेऊन शेतशिवारात धावपळ करताना दिसत आहेत. 

अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून माळरानावर कांदे ढीग लावून प्लॅस्टिक कागदाने झाकून ठेवलेले आहेत. यातच काढणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने काढणीस विलंब लागत आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला जातो, की काय? अशी चिंता शेतकऱ्यांस लागून राहिली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT