Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

दराअभावी टोमॅटो बागा सोडण्याची वेळ; वाठार स्टेशनात शेतकरी आर्थिक संकटात

अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि. सातारा) : शेतकऱ्यांनी तीन महिने अतिशय मेहनत करून हजारो रुपये खर्च करून आणलेल्या टोमॅटोला सध्या भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या बहरलेल्या बागा सोडून दिल्या आहेत. 

वाठार स्टेशन परिसरातील वाठार स्टेशनसह जाधववाडी, फडतरवाडी, विखळे, तळीये, बिचुकले, नलवडेवाडी आदी गावांतील शेतकरी नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागण करतात. मुळात या भागात पाण्याच्या कमतरतेमुळे उसासारखी बारमाही पिके शेतकरी घेऊ शकत नाहीत. घेवडा, वाटाणा, ज्वारी ही पिके जादा पैसे मिळवून देत नसल्याने या भागातील शेतकरी टोमॅटोचे पीक घेत असतो. टोमॅटोला उत्पादन चांगले भेटत असल्याने एकमुठी चांगला पैसाही मिळतो. या पिकाला सरासरी एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. मागील महिन्यात टोमॅटोस किलोला 15 ते 20 रुपये भाव मिळत होता. मात्र, गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून हळूहळू भाव ढासळून तो सध्या चार ते पाच रुपयांर्यंत आला आहे. 

टोमॅटोला लागणारी खते, औषधांच्या किंमती अतिशय वाढलेल्या असून, याला मजूरही मोठ्या प्रमाणात लागतात. टोमॅटो लागणीपासून काठी, तार, बांधणी, खते, फावरण्या एवढी मेहनत करून सध्या भाव नसल्यामुळे टोमॅटो तोडणीची मजुरी व गाडी भाडेही निघत नसल्यामुळे काही काही शेतकऱ्यांवर बागा सोडून देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

आपण तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोची लागण केली असून, सध्या पीक तोडणीस आले आहे. मात्र, भाव कमी होत असल्याने मजुरीही निघत नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा. 
-तानाजी जाधव, शेतकरी, जाधववाडी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT