Satara Latest Marathi News 
सातारा

कांद्याने केला वांदा! भाव गडगडल्याने उत्तर खटावात शेतकरी अडचणीत; बाजारभावात मोठी घसरण

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. यंदा दूषित हवामानामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली असून, अपेक्षित भाव नसल्याने कांदा उत्पादक आता दुहेरी संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च व प्रत्यक्षात मिळणारा भाव पाहता, कांद्याने वांदा केल्याचे खटाव तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. 

गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बीची कांदा लागवड वाढली. मात्र, अवकाळी आणि सततचे बदलते वातावरण यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते कांदा लागवड करण्यावर खूप मोठा खर्च झालेला आहे. अनेकांनी सतत सहा महिने शेतात राबून वेळच्यावेळी कांद्याची काळजी घेऊन चांगले पीक घेतले. तरीदेखील, बाजारभावात घसरण होत असल्याने येथील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांद्याच्या पिकांवर दुष्परिणाम होऊन मागास कांद्याच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. तसेच उन्हाचा तडाखा बसल्यास कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने त्याची साठवण करता येत नाही. परिणामी, कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कांदा विकावा लागत आहे.

कांदा उत्पादन खर्च (एकरी) :

  • पूर्व मशागत (नांगरट, वाफे तयार करणे) - 5000
  • रोपे तयार करणे - 10000
  • लागवड - 9000
  • दोन भांगलण - 5000
  • पाणी (दहा) - 10000
  • औषधे (चार ते पाच फवारण्या) - 10000
  • काढणी, मजुरी  - 11000
  • एकूण खर्च -  60000
  • एकरी उत्पादन - 80 ते 90 क्विंटल
  • दर - 900 - 1000
  • एकूण सरासरी उत्पन्न - 70 ते 80 हजार

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT