Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

उत्तर कोरेगावात रब्बी पीक जोमात; पुणे, नगर, साताऱ्यातून ज्वारीला मोठी मागणी

अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि. सातारा) : उत्तर कोरेगाव हे ज्वारी पिकाचे आगार मानले जाते. या परिसरात दरवर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. यावर्षी हे पीक जोमात असून, ज्वारीला चांगला उतारा मिळण्याची आशा आहे. 

उत्तर कोरेगावातील वातावरण हे जवळपास सर्व पिकांना पोषक असे आहे. या ठिकाणी स्ट्रॉबेरी, द्राक्ष, डाळींब या नगदी उत्पादनांसह इतर कोरडवाहू पिके घेतली जातात. परंतु, पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामात येथील शेतकरी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. या पिकाला कमी भांडवल लागत असून, धान्य आणि वर्षभर जनावरांच्या चाऱ्यासाठी हे पीक येथील शेतकऱ्यांना फायदेशीर पडते. सध्या येथील ज्वारी हुरड्याच्या स्थितीत असून, तीन ते 
चार आठवड्यांत ज्वारी काढणी सुरू होईल. 

येथील ज्वारीला पुणे, सातारा, नगर येथून मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा निघणारा कडबाही जनावरांना खाण्यास चविष्ट असल्याने सातारा जिल्ह्यासह शिरवळ भागातील शेतकरी येथील कडब्याला पसंती देतात. यावर्षी ज्वारीचे पीक चांगल्या स्थितीत असल्याने याला उतारा ही चांगला मिळण्याची शक्‍यता आहे. यावर्षी ज्वारीबरोबर घेवड्याचेही पीक येथील शेतकऱ्यांनी घेतले आहे. वाळक्‍या घेवड्याला आता 90 ते 100 रुपये प्रति किलो असा भाव असून, ज्वारीलाही 35 ते 40 रुपये भाव मिळण्याची शक्‍यता आहे. 

सध्या जुन्या ज्वारीचे दर हे प्रति किलो 20 ते 25 रुपये असून, नव्या ज्वारीला प्रति किलो 35 ते 40 रुपयांचा भाव मिळण्याची शक्‍यता आहे. 
-रेवणसिद्ध महाजन, व्यापारी, पिंपोडे बुद्रुक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT