Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात; माण तालुक्‍यात पक्ष्यांची चंगळ

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : "ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात' अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. कुकुडवाड परिसरातील ग्रामीण भागातील शेतशिवारात ज्वारीची पिके जोमात आलेली आहेत. आज हुरडा पार्टी कालबाह्य होत चालली असली तरी पाखरांची मात्र "हुरडा पार्टी' जोमात चालली आहे. डिसेंबरच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतातील ज्वारी बहरात येऊ लागते आणि त्यातच पाखरांचे थवे किलबिलाटाने ज्वारीच्या कणसावर बसून जणू "हुरडा पार्टी' साजरी करत आहेत, असे चित्र दिसते. 

ज्वारी फुलोऱ्यात आली की बळीराजा गोफण घेऊन पिकांवरील पाखरं हाकायला तयार होतो. जोरजोरात हारोळ्या टाकून बळीराजा या पाखरांना हाकलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीदेखील काही पक्षी या फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीचा आनंद घेतातच. त्याच पद्धतीनं अनेक भागात हौशी लोकही गरमागरम भाजलेल्या ज्वारीची मजा घेण्यासाठी थेट शिवारात येतात आणि हुरडा पार्टी साजरी करतात. 

यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारीचे पीक जोमदार आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाखरांचे थवे मोठ्या प्रमाणात पिकांवर हुरडा पार्ट्यात रंगताना दिसताहेत. या हुरडा पार्टीची खासियत म्हणजे चुलीवरचं जेवण. भाकरी, पिठलं, ठेचा, दही यासह विविध प्रकारच्या चटण्यांनी ताट भरून गेलेले असते. पूर्वी नवीन वर्षाच्या स्वागताला अशा हुरडा पार्ट्यांच्या निमित्ताने पाहुणे, मित्रमंडळींना घरी बोलावून त्यांचा पाहुणचार करण्याची परंपरा शेतकरी वर्गात होती. मात्र, आता शिवारातील हुरडा पार्ट्या कमी झाल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT