Ajinkyatara Sugar Factory Election sakal
सातारा

सातारा : अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक बिनविरोध

पाच अर्ज अवैध; शेतकरी संघटना न्यायालयात जाणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : अर्जाच्या छाननीत शेतकरी संघटनेचे चार व एका अपक्षाचा अर्ज अवैध ठरल्याने २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने अजिंक्यतारा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणास्तव अवैध ठरविल्याने या विरोधात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले आहे. (Ajinkyatara Sugar Factory Election)

शाहूनगर (शेंद्रे) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये राखीव जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी बिनविरोध झाले आहेत. पण, गोवे, चिंचणेर, नागठाणे ऊस उत्पादक गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एका अपक्षाने अर्ज दाखल केले होते. आज दाखल अर्जांची छाननी झाली. यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे चार व एका अपक्षाचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. छाननीत अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये नागठाणे गट : अरुण निकम, चिंचणेर गट : राजेंद्र बर्गे, भिकू शेळके, दत्तात्रय शिंदे, गोवे गटातून अर्जुनराव साळुंखे यांचा समावेश आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणास्तव अवैध ठरविले आहेत. त्यामुळे या विरोधात आपण न्यायालयात अपील करणार असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT