सातारा : अजिंक्यताऱ्याला सलग दुसऱ्या वर्षी शिखर संस्‍थेचा पुरस्कार sakal
सातारा

सातारा : अजिंक्यताऱ्याला सलग दुसऱ्या वर्षी शिखर संस्‍थेचा पुरस्कार

गिरीश चव्हाण

सातारा : दिल्‍ली येथील नॅशनल फेडरेशन केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सन २०२०-२०२१ चा 'हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया' हा इफिशियन्सी पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल फेडरेशनकडून यापूर्वी सन २०१९-२० च्या हंगामाकरीता अजिंक्यतारा कारखान्यास 'बेस्ट केन डेव्हलपमेंट इन हाय रिकव्हरी एरिया' पुरस्कार प्राप्त झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिखर संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने देशाच्या सहकार क्षेत्रात अजिंक्‍यताऱ्याचा नावलौकिक वाढीस लागला आहे.

यापुर्वी अजिंक्यतारा कारखान्यास तांत्रिक गुणवत्ता, कार्यक्षमता व अत्युत्तम उत्पादन क्षमतेच्या आधारे देश व राज्यस्तरावरून एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सन २०२०-२१ व मागील सन २०१९-२०२० चा पुरस्कार वितरण सोहळा ता.१६ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. नॅशनल फेडरेशनकडून कारखान्यास सलग दुस-याही वर्षी पारितोषिक प्राप्त झाले, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद असून कारखान्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

काटकसरीचे धोरण अवलंबून कारखान्‍याचा कारभार सभासदाभिमूख करण्यात येत आहे. तालुक्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले असून त्यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून संचालक मंडळ नेहमीच सभासद हितासाठी कार्यरत राहील, असेही श्री. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले. याबाबत कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे यांच्‍या रुपाने खंबीर व कुशूल नेतृत्व मिळाल्यामुळे कारखाना प्रगतीपथावर असून कारखान्‍याची दखल राज्‍य आणि देशापातळीवर त्‍यामुळेच घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT