nitin gadkari sakal
सातारा

सातारा : अजिंक्‍यतारा रोप-वे प्रकल्‍प केंद्राच्‍या निधीतून

नितीन गडकरी यांचे आश्‍‍वासन; उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा

सातारा : अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते खालची मंगळाई मंदिर परिसर या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्‍चित केले आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांच्या परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजूंकडून आठ आसनक्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉली ये-जा करतील. त्‍यासाठी आवश्‍‍यक जागा उपलब्‍ध असून, ९२ कोटींच्‍या केबल रोप-वे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीतून करण्‍याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. लवकरच केंद्र तसेच पालिकेच्‍या माध्‍यमातून अजिंक्यतारा रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.

दिल्ली येथे आज उदयनराजे यांनी भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेत रोप-वे प्रकल्‍पाबाबत चर्चा केली. या वेळी उदयनराजे म्‍हणाले,‘‘अजिंक्यतारा किल्‍ल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्‍पकाळ वास्तव्य होते. या किल्‍ल्यावरील तळी पर्यावरण, इतिहासप्रेमींच्‍या मदतीने पुनरुज्‍जीवित केली जाणार आहेत. किल्‍ल्यावरील ऐतिहासिक वास्‍तूंचे अवशेष तसेच राजसदर चौथरा अद्यापही सुस्‍थितीत आहे.

किल्‍ल्‍याचा विस्‍तार ७० एकरांत असून, अजिंक्यतारा सातारकरांचा अभिमान आहे. राज्‍यभरातील पर्यटक अजिंक्यतारा किल्‍ल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. दरवाजापासून चढण, पायऱ्या असल्‍याने वृध्‍द नागरिकांना किल्‍ल्‍यावर जाता येत नाही. यामुळे रोप-वेचा प्रस्‍ताव केल्‍याची माहिती श्री. गडकरी यांना दिली.’’

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या अजिंक्यताऱ्यावर रोप-वेची उभारणी केंद्राच्या निधीमधून करण्याची ग्‍वाही श्री. गडकरी यांनी दिल्‍याची माहिती उदयनराजेंनी पत्रकात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada: ५० रुपये पगार मिळवणाऱ्या मुख्याध्यापकाने जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला कसे झुकवले? मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा हीरो!

Share Market Profit : १०३ रुपयांच्या शेअरने माजवला कहर... १०,००० रुपयांचा नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा!

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

"अरे हा सीन तर या सिनेमाची कॉपी" जानकीने केली ऐश्वर्याची पोलखोल पण प्रेक्षकांनी पकडली 'ती' चूक!

Kunbi Certificates : कुणबी प्रमाणपत्रांबाबत फडणवीस सरकारच्या मंत्र्यांलाच संशय, खळबळजनक विधानाची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT