patan 
सातारा

आधीच आजारी बिबट्या नदीत बुडाला...

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) ः पाटण तालुक्‍यातील माणगाव- मोरगिरी जवळील मोरणा नदीच्या पात्रात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेली मादी आहे. बिबट्या मृत अवस्थेत पाण्यातून वाहत आला होता. बिबट्याला न्यूमोनिया झाला होता. त्याचा बुडून मृत्यू झाला. 

नदीपात्रात वाहत आलेला गावकऱ्यांना दिसला. तो मोरणा नदीत पाण्याच्या पत्रात एका झाडाला अडकला होता. एका गुरख्याने ते पाहिले. त्यांनी तत्काळ पाटण येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनक्षेत्रपाल विलास काळे पाटण येथेच असल्याने तत्काळ घटनास्थळी इतर कर्मचाऱ्यांना घेऊन पोचले. बिबट्याला पाण्यातून बाहेर काढले. तेथेच घटनेचा पंचनामा झाला. त्यानंतर बिबट्याचे तळबीड येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बुधकर यांनी पोस्टमार्टम केले. पाटणचे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने वनक्षेत्रपाल काळे यांना बिबट्याला तळबीड येथे घेऊन यावे लागले. 

डॉ. बुधकर यांनी पोस्ट मार्टममध्ये मृत बिबट्या ही मादी होती व त्याचे वय अंदाजे 4 वर्ष होते. बिबट्याचे दात, मिशी, नखे सुस्थितीत होते. बिबट्याचा मृत्यू हा न्यूमोनिया व बुडून झाल्याचे डॉ. बुधकर यांनी सांगितले. बिबट्याचा पोटात खाल्लेले अन्न होते. कोणत्याही प्रकारचे विष प्रयोग झालेले नाही. असे स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा मृत्यू एक दिवस आधी झाला असल्याचे सांगितले. पोस्ट मार्टम व्हिडीओ व छायाचित्रीत केले आहे. त्यानंतर बिबट्यास 5.30 ला वराडे येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत दहन करण्यात आले. दहन करताना सहायक वनसंरक्षक किरण कांबळे वन्य जीव अभ्यासक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल रामदास धावटे, वनपाल ए. पी. जाधव, मोरगिरी बिटचे वनरक्षक बंडू माने उपस्थित होते. त्यांनी बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खातरजमा केली. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT