Satara 
सातारा

पाचगणीत शेतकऱ्यांना भाजीविक्रीस अटकाव, प्रस्थापितांकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्नही

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : कोरोनाचा कहर व लॉकडाउनच्या परिस्थितीत ग्राहक व बाजारपेठेच्या कमतरतेने शेतकरी पूर्णपणे कोलमडला असताना मिळेल त्यात समाधान मानून नुकसान टाळण्यासाठी शेतात पिकवलेला माल स्वतः शेतकरी पाचगणी बाजारपेठेमध्ये जावून विकत आहेत. मात्र, काही प्रस्थापित भाजीविक्रेते या शेतकऱ्यांना भाजी विकण्यास अटकाव करत असल्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी या गिरिस्थानाच्या परिसरातील गावांत स्ट्रॉबेरी, फराशी, बटाटा, वाटाणा, घेवडा, मुळा, गाजर, मेथी अशा प्रकारच्या विविध भाज्या शेतकरी घेतात. पूर्वी या भाज्या हा शेतकरी इतर बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना होलसेल दरात विकत असत. परंतु, सध्या लॉकडाउनचे काही निर्बंध आणि कोरोनाच्या महाभयंकर संसर्गित रोगाच्या काळात ग्राहकांअभावी मालाचे मोठे नुकसान होत आहे.

काही वेळा हा माल शेतातच सडून जात आहे. मार्चपासून देशात लॉकडाउन घोषित झाला आहे. त्यानंतर पहिले काही दिवस शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. कारण, शेतमाल विकण्याची जुनी साखळी विस्कळित झाली होती. त्यामुळे भाज्या व फळे शेताच्या बांधावर सडू लागली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे अवसान गळाले होते. तर काहींनी सावरत वेगळे मार्ग काढले. त्यांनी स्वत: शहरात आणि शेजारच्या गावांत जाऊन सरळ ग्राहकांना शेतमाल विकायचे ठरवले. परंतु, सध्या बंद परिस्थितीत आर्थिक गणितही कोलमडल्याने हतबल झालेला शेतकरी सध्या बाजारात स्वतः जावून माल विकण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु, बाजारपेठेतील प्रस्थापित भाजी व्यापारी या शेतकरी वर्गाला माल विकण्यासाठी अटकाव करत आहेत तर काही वेळा दमदाटी करून त्यांना बाजारातून हुसकावून लावत आहेत. हा या शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. 

पाचगणी बाजारपेठ तशी छोटी आहे. त्यामुळे मोजकेच भाजी व्यापारी कार्यरत आहेत. शाळा, हॉटेल यांना तसेच किरकोळ विक्रीवर त्यांची गुजराण आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणण्यासाठी कसलीही परवानगीची गरज नाही. परंतु, पाचगणी येथील तथाकथित प्रस्थापित भाजी व्यापाऱ्यांचा सोस या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. आपला माल विकून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करत आहेत. कुटुंबाची होत असणारी आर्थिक कोंडी फोडण्यासाठी चाललेली त्यांची ही धडपड बाजारातील जुन्या व्यापाऱ्यांकडून हाणून पाडली जात आहे. प्रसंगी हे व्यापारी त्यांना दमदाटी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

""आपल्या शेतातील भाजी बाजारात विकणे, हा त्या शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यांना कुणीही माल विकण्यासाठी मज्जाव करू शकत नाही. तो कुठेही माल विकू शकतो. अशा शेतकऱ्यांना जर कोणी दमदाटी केल्याचे आढळल्यास आम्ही त्यांना आमचा हिसका दाखवू.'' 

-दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT