पक्षी sakal
सातारा

Satara : येरळवाडी तलावात पट्टेरी राजहंस पक्षाचे आगमन; पक्षीप्रेमी - अभ्यासकांना पर्वणी

जलचर वनस्पती व लहान किटक आढळून येत असल्याने नायजेरीया, युरोप, ऑस्ट्रिया,

आयाज मुल्ला

वडूज : येरळवाडी (ता.खटाव) येथील मध्यम प्रकल्पात सद्या पट्टेरी राजहंस पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पर्यटक व पक्षीप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे यावर्षी खटाव, माण तालुक्यात पुरेसा पाऊस झाल्याने येरळवाडी तलावात पुरेश्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे.

याठिकाणी जलचर वनस्पती व लहान किटक आढळून येत असल्याने नायजेरीया, युरोप, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलीया या मध्य आशियाई देशांतून हे पट्टेरी राजहंस पक्षी हजारो किलोमिटरचे अंतर पार करून तलाव परिसरात वावरताना दिसत आहेत. सद्या येरळवाडी तलावात चार ते पाच तर सुर्याचीवाडी येथील तलावात आठ ते दहा पट्टेरी राजहंस आढळून येत आहेत. या पक्ष्यांची उंची दोन ते अडीच फूट असून ते धष्टपुष्ट शरीरयष्टीचे आहेत.

रंग पांढरा व राखाडी असून त्यांच्या अंगावर राखाडी, पांढऱ्या रंगाचे पट्टे असल्याने त्यांना पट्टेरी राजहंस संबोधले जाते. हे पक्षी समुहाने राहत असून एप्रिल महिन्या अखेरपर्यंत ते तलाव परिसरात वास्तव्यास असतात. याकाळात ते येथे अंडी तयार करतात व पुन्हा मायभूमीत जावून त्याठिकाणी प्रजनन करतात अशी माहिती येथील प्रख्यात वैद्यकीय व्यवसायिक व हौशी छायाचित्रकार, पक्षी अभ्यासक डॉ. प्रविण चव्हाण यांनी दिली.

येरळवाडी, सुर्याचीवाडी, दरजाई, पेडगाव या तलावांतदेखील या पक्ष्यांचे वास्तव्य आढळून आले आहे. याशिवाय सद्या येरळवाडी तलाव परिसरात रूडी शेल्डक (चक्रवाक), सँड पायपर, (कोरल टिंबा), प्रॅटीन कोल, (छोटा आर्ली, पाणभिंगरी), गल्स, विविध प्रकारचे बगळेही वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहेत. येरळवाडी तलाव परिसरात १६८ तर पेडगाव तलाव परिसरात शंभरहून अधिक विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

येत्या आठवडाभरातच तलाव परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचेही आगमन होईल असे डॉ. चव्हाण, निनाद जगताप यांनी सांगितले.

डॉ. प्रविण चव्हाण, वडूज (हौशी छायाचित्रकार व पक्षी निरीक्षक)

फ्लेमिंगोंच्या आगमनापूर्वी येरळवाडी तलावात पट्टेरी राजहंस हे देखणे पक्षी दाखल झाले आहेत. तलाव परिसरात दाखल होणारे विविध प्रकारचे पक्षी हे पक्षीप्रेमी व अभ्यासकांसाठी पर्वणीच आहेत. तलाव परिसरातील जैवविविधतेचे प्रत्येकाने रक्षण करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT