Satara 
सातारा

पाटणमधील बळिराजा होतोय टेक्‍नोसॅव्ही

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा)  : पाटण तालुका म्हणजे पाऊस आणि पाण्याचे आगार. पाणीच उशाला असल्याने नदीकाठचे युवक शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे वळले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन हे समीकरणच सध्या आधुनिक शेतीमध्ये बळ घेऊ लागले आहे. 

सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची संचारबंदी सर्व उद्योग, व्यवसायांना अडचणीत आणणारी झाली आहे. बहुतेक युवक संचारबंदीमुळे गावी आले असून, घरी बसून पोट कसे भरणार, या आर्थिक विवंचनेत ग्रामीण भागातील युवक सापडले आहेत. युवक मिळेल ते काम करताना दिसत आहेत. सद्य:स्थितीत पुण्या-मुंबईची संसर्गाची भयानकता पाहून अनेकांनी लॉकडाउनचा आधार घेत छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. यात भाजीपाल्याच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे आवक-जावक कमी प्रमाणात दिसत आहे. यामुळे गावातील भाजीपाला गावासोबत इतर गावांत जाऊन स्वतः विकण्यासाठी अनेक युवक पुढे येत आहेत. यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रात युवकांपुढे स्वयंरोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यातच ग्रामीण भागातील युवक आधुनिक शेतीकडे वळला असून शेतीत नवनवीन प्रयोगदेखील करतानाही दिसत आहेत. 

पाटण तालुक्‍याचा मारुलहवेली हा भाग अल्पावधीमध्ये बागायती शेतीसाठी नावारूपास आला आहे. टेळेवाडी (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी गणेश बाबर या युवकाने आपल्या 15 गुंठे क्षेत्रात मंजेरी जातीच्या वाणाची वांग्याची रोपे लावली असून, सरीवर तणापासून रोपांचे संवर्धन व्हावे म्हणून मल्चिंग पेपर वापरला आहे. रोपास हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य कीटकनाशकांचा वापर करून रोपांचे रक्षण केले आहे. साधारण एका झाडाला आजमितीला 70 ते 80 फुलकळ्या असून, रोपाची उंची साडेतीन फुटांइतकी वाढलेली आहे. रोपांचा वादळी वाऱ्यापासून बचाव व्हावा म्हणून बांबू वर तार खेळवून झाडांना आधार दिला आहे. सध्या रासायनिक खते व टॉनिक आणि कीटकनाशके फवारणी करून रोपांची निगा राखली जात आहे. 


""मी एक सामान्य शेतकरी आहे. तुटपुंज्या शेतीच्या जिवावर संसारगाडा चालू आहे. शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. अत्यंत कमी खर्चात संपूर्ण खर्च वजा जाता मला एक ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.'' 

-गणेश बाबर, 
शेतकरी, टेळेवाडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT