khatav
khatav 
सातारा

राजस्थानी कनेक्‍शनने बनपुरीकर चिंतेत

सकाळ वृत्तसेवा

कातरखटाव (जि. सातारा) ः बनपुरी (ता. खटाव) येथे बुधवारी रात्री एक जण कोरोनाबाधित सापडला आहे. तो रुग्ण राजस्थानमधील कोटा या शहरातून आला असल्यामुळे बनपुरीकरांची चिंता वाढली आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाउन आहे. कडक लॉकडाउन असला तरी गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्गाने बाहेरच्या राज्यांतील तसेच मुंबई, पुणे येथील लोकांनी गावाकडे धाव घेतली आहे. बनपुरीत गेल्या दोन महिन्यांत अंदाजे 200 लोकांचा लोंढा आला आहे. 21 मे रोजी 15 ते 20 लोकांची गाडी राजस्थानमधील कोटा येथून बनपुरीत आली. यामधील सर्व लोकांना बनपुरी शाळेत क्‍वारंटाइन करण्यात आले. यामध्ये एक 42 वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. हा बाधित युवक शाळेत क्‍वारंटाइन न राहता स्वतःच्या घरामध्येच क्‍वारंटाइन होऊन राहिला होता. गावातील भाजीपाला विकणाऱ्या युवकाशी त्याचा संपर्क आला होता. घरामध्ये वरच्या मजल्यावर त्याच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती. सख्खे आणि चुलत भाऊ असे मिळून 11 माणसांचे कुटंब राहात होते. 

चार दिवसांपूर्वी त्याला खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला. त्याचा त्रास कमी होत नसल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बनपुरीकरांची चिंता वाढली आहे. या कुटुंबातील इतर पाच सदस्यांना मायणीत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी...

दरम्यान, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदी कोरोना समिती अधिकाऱ्यांनी बनपुरीस भेट दिली असून, परिसर सील करण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT