सातारा

सरकाराने सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या : नाभिक असोसिएशनची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : लाँकडाऊनमुळे सुमारे अडीच महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असतानाही सलून व्यवसाय सुरू करु शकत नसल्याने सदाशिवगड विभागातील दहा  गावांतील सलून व्यवसायीकांनी आज (बुधवार) ओगलेवाडी येथे त्यांच्या दुकानातील साहित्य संघटनेकडे जमा केले. त्यानंतर ओगलेवाडी नभिक असोसिएशनने पालकमंत्री, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देवून समाजाची उपासमार थांबवण्यासाठी तातडीने अर्थिक मदत द्यावी, अन्यथा अटी व नियमांचे पालन करून सलूनची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही केली. 

सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, नायब तहसीलदार विजय माने यांना आज निवेदन दिले. यावेळी, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत काशिद, उपाध्यक्ष कैलास झेंडे, कृष्णत काळे, राजन सपकाळ, प्रकाश जाधव, आण्णासो काशिद, गणेश जांभळे, संजय शेटे, सतीश जांभळे, कृष्णत काशिद, नितीन काशिद, सतीश सपकाळ, राजू खंडागळे आदी उपस्थित होते. 

निवेदनातील आशय असा : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात मार्चपासून लाँकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून सर्व सलूनची दुकाने बंद आहेत. लाँकडाऊन शिथील केल्यानंतर अटी व शर्थीवर सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. मात्र पुन्हा दुकाने बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. नाभिक समाजाकडे शेती नाही, सलुनच्या व्यवसायावरच समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अडीच महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे गंभीर संकट आहे. याचे भान समाजाला आहे. म्हणूनच शासनाच्या सुचनांचे पालन करत अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद ठेवला आहे.

प्रशासनाने अन्य उद्योग, व्यवसाप्रमाणे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही अटी व शर्थी घालून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. नाभिक समाज शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करुनच व्यवसाय करेल असेही अध्यक्ष काशिद यांनी यावेळी सांगितले. यावेळी ओगलेवाडी, करवडी, वाघेरी, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची, गजानन हौसिंग सोसायटी,सुर्ली, कामथी येथील नाभीक बांधवांनी साहित्य एकत्र केले.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : टोमॅटोला मिळू लागला चांगला दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT