Satara 
सातारा

ऊस उत्पादकांसाठी "हे' फायदेशीर, मुंढ्यात पहिला प्रयोग ठरला यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

विंग (जि. सातारा)  : कऱ्हाड तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ऊस रोपे निर्मितीसाठी "सुपर केन नर्सरी' ऊस उत्पादकासाठी फायदेशीर ठरते आहे. केवळ 60 ते 70 पैशाला रोप तयार होत आहे. मुंढे (ता. कऱ्हाड) येथे एका ऊस उत्पादकाच्या शेतावर पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे. 

मुंढे येथील शेतकरी संभाजी साळवे यांच्या शेतावर सुपर हा प्रयोग केला आहे. त्यात तीन फूट रुंद व गरजेनुसार लांबी ठेऊन बेड तयार केली आहेत. 86032 या वाणाची निवड त्यांनी केली आहे. एक डोळा पद्धतीने कांड्या तयार करून कीटकनाशक व बुरशीनाशक द्रावणात बुडवल्या. 24 तास प्रक्रिया केल्यानंतर बेडवर रिकामी पोती अंथरून प्रक्रिया केलेल्या कांड्या काढून एकला एक जोडून पोत्यावर अंथरून घेतल्या. असितोबॅक्‍टेरियाची व ट्रायकोड्रमाची फवारणी त्यावर केली. अर्धा इंच मातीत कुजलेले शेणखत मिसळून त्यावर चढवून कांड्या बुजवल्या. गरजेनुसार दररोज रात्री झारीने पाणी दिले.

दोन आठवडे झाल्यावर चांगले कोंब त्यातून बाहेर पडले. उगवण क्षमता 95 टक्के झाली आहे. तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री. साळवे यांनी चार एकरांसाठी नर्सरी तयार केली असून, 27 हजार रोपांची निर्मिती केली आहे. औषधे बी-बियाण्यासाठी 14 हजार खर्च आला असून, प्रतिरोप 60 ते 70 पैसे पडले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडलाधिकारी अशोक कोळेकर, कृषी सहायक एम. जी. साळुंखे त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT