jawali 
सातारा

वाढदिवस साजरा झाला; पण कुणाचा!

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : कुशी (ता. सातारा) व महामुलकरवाडी (ता. जावळी) येथील युवकांनी अत्यंत अवघड, ओसाड असणाऱ्या सोळपणी नावाच्या डोंगरावर सिद्धनाथ मंदिर परिसरात गेल्या वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. "झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेश देतानाच या युवकांनी झाडे कशी जगवायची याचे उदाहरण दिले. 

कुशीचे सरपंच अमोल चव्हाण व माजी सरपंच मारुती शिंदे, वृक्षमित्र मंगेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून येथील युवकांनी डोंगरावर झाडे लावण्याच्या उपक्रम सुरू केला. दर वर्षी त्यांचा वाढदिवस करायचा. त्यामुळे झाडेही जगवता येतील, त्यांचे संगोपनही होईल, असे ठरले. गेल्या वर्षी येथील परिसरात अंबा, चिकू, चिंच, आवळा, नारळ अशी सुमारे 100 झाडे लावण्यात आली. त्यानंतर या झाडांना वर्षभर खालून डोंगरावर कावडीने, प्लॅस्टिक कॅनने पाणी आणून श्रमदान करत झाडे जगवली. चांगल्या पद्धतीने जतन केलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

युवकांनी केलेल्या परिश्रमाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. या वेळी अमोल काकडे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद सावंत, प्रशांत साळुंखे, तुषार सकुंडे, संभाजी चव्हाण, श्रीमंत शिंदे, किरण साळुंखे, रामदास शिंदे, अमोल साळुंखे, सचिन साळुंखे, ज्ञानदेव शिंदे, सुमित साळुंखे, अक्षय गायकवाड, रणजित साळुंखे, सुशांत शिंदे, विक्रम खंडजोडे, वैभव शिंदे, रोहित साळुंखे आदी उपस्थित होते. 


आम्ही युवकांनी गेल्या वर्षभरात या ठिकाणी वणवेदेखील लावू दिले नाहीत. लागलेले वणवे अथक प्रयत्न करून विझवले. लावलेल्या झाडांचे वाढदिवस दर वर्षी साजरे करून परिसरातील झाडांचे घरातील परिवारातील सदस्य असल्याप्रमाणे संगोपन करणार आहोत. 

- मंगेश साळुंखे, वृक्षमित्र, कुशी 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT