Satara
Satara 
सातारा

गॅस सिलिंडरची परस्पर नोंदणी करून काळ्या बाजाराने विक्रीही!

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : परिसरात गॅस वितरण करणाऱ्यांकडून सिलिंडरचा काळाबाजार सुरू आहे. अनेकांच्या नावावर परस्पर सिलिंडरचे बुकिंग करून त्याची विक्री होत असल्यामुळे एजन्सीचा विस्कळित कारभार चव्हाट्यावर आला आहे. गॅसधारकाने बुकिंग न करताही त्यांच्या सिलिंडरचे परस्पर बुकिंग होत असल्याने गॅसधारकही हैराण आहेत. त्यामुळे भागात सिलिंडरची काळ्या बाजाराने विक्री होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

ग्रामीण सिलिंडरचा वापर वाढलेला आहे. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ग्राहकांना एक स्टोव्ह आणि एलपीजी गॅस देण्यात येतो. त्याची किंमत तीन हजार 200 इतकी आहे. त्यात एक हजार 600 रुपये अनुदान सरकार देते. बाकी रक्कम कर्जाऊ स्वरूपी असल्याने ते हप्त्याने परत करावे लागतात. योजनेद्वारे अल्पदरात सिलिंडर घरपोच झाला. मात्र, बरेच महिने सिलिंडर घेतला नाही तरी त्यांच्या नावे बुकिंग होऊन सिलिंडरची विक्री झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. काही लोकांना सिलिंडरची गरज भासली म्हणून त्यांनी बुकिंग केल्यानंतर हा प्रकार समोर आला. सिलिंडरचे पुनर्भरण परवडत नसल्याने अनेकांनी तिकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे. 

गॅस एजन्सीधारक हे उज्ज्वला गॅस योजनेसाठी ग्रामीण वितरकांमार्फत गावोगावी जनजागृती करत असले तरी त्या योजनेतून अनेकांना अद्यापही गॅस मिळालेला नाही. सिलिंडर महागडा असल्याने बहुतांशी महिला या अनुदानाने मिळालेला सिलिंडर वापरतात. पुन्हा सिलिंडर घेण्यासाठी जात नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊन सिलिंडरचा काळाबाजार होताना दिसतो आहे. त्यासाठी गॅस एजन्सीधारकांवर चाप लावून जागृती करणे अपेक्षित आहे. 


""उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांना फायदा झाला आहे. परंतु, गॅस एजन्सीवाले गॅस सिलिंडर बुकिंग करून गॅस काळ्या बाजाराने विकत आहेत. वाढत्या महागाईमुळे संसाराची होत असलेली ओढाताण, त्यामध्ये हा महागडा गॅस कसा वापरायचा? ही विवंचना असताना गॅस एजन्सीवाले मनमानी कारभार करत असल्याने गॅसअभावी गैरसोय होऊ लागली आहे.'' 

-शालन निकम, 
नाटोशी (वरेकरवाडी) 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT