satara bus accident esakal
सातारा

Pune-Bangalore highway Accident : भीषण अपघात! भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं, गाडीचा स्फोट; बसही जळून खाक

satara bus accident: घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे फौजफाटा घेवून पोहचले. किसनवीर कारखाना आणि वाई नगरपालिकेच्या आग्नीशामक यंत्रणांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. यादरम्यान सातारा बाजूकडे जाणारी वहातूक ठप्प झाली होती.

विलास साळुंखे

सातारा (भुईज) : पुणे-बंगळूरु महामार्गावर बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या विचित्र अपघात झाला. दुचाकी व एस.टी. बस अपघातात दुचाकी पेटल्याने एस.टी. बसही पेटली. या एकाचा मृत्यू झाला. मदतकार्य वेळेत पोहचल्याने व प्रसंगावधान राखल्याने ३५ प्रवाशी बचावले आहेत.

साताऱ्यातल्या भुईंज-पाचवडदरम्यान महामार्गावर हॉटेल विरंगुळासमोर एस. टी. बस आणि दुचाकी अपघातात एक ठार तर एस.टी बससह दुचाकी जळून खाक झाली आहे. सुदैवाने ३५ प्रवाशी वाचले आहेत.

पुणेहून सातारा बाजूकडे जाणाऱ्या कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी चालकाला एस. टी. बस त्र्यंबकेश्वर ते पलूस जाणारे बसने MH 40 AQ 6303 ने पाठीमागून जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात चालकासह दुचाकीने पेट घेतला व त्याचवेळी एस. टी. बसही पेटली. प्रसंगावधान राखत मदतकार्य करणाऱ्यांनी एस. टी. बसमधील प्रवाशी यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेत दुचाकी चालकाचा होरपूळ मृत्यू झाला.

घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे फौजफाटा घेवून पोहचले. किसनवीर कारखाना आणि वाई नगरपालिकेच्या आग्नीशामक यंत्रणांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. यादरम्यान सातारा बाजूकडे जाणारी वहातूक ठप्प झाली होती.

कारखान्याचे आणि वाई नगरपालिकेचे आग्नीशामक यंत्रणेने मदतकार्य करून आग आटोक्यात आणली होती या अपघातातील पेटलेली दुचाकी व दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू होते. दरम्यान पोलीसांनी जळून खाक झालेल्या मोटार सायकलच्या चेसी नंबरवरून माहिती घेतली असता ती गाडी यामाहा कंपनीची असून ती स्वप्नील शरद डुबल रा. वडवली ता. कराड जि. सातारा यांचे नावावर असल्याचे आर टी ओ अॅपवरून समजत असल्याची माहिती मिळाली.

  • घटनास्थळी दुचाकी चालकासह पेटतच होती. मदतकार्य करणारांना इच्छा असूनही दुचाकी चालकाला वाचवता येत नव्हते. तर पेटलेल्या एस. टी. च्या आगीची दाहकता पाहून पुढे जाण्यास कोणीही धजवत नव्हते.

  • पेटलेल्या एस. टी. बसमध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले यातच नुकतीच पोलीस भरतीला गेलेल्या एका युवतीची कागदपत्रासह बॅग जळाल्याने तिचा घटनास्थळी आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT