Satara 
सातारा

जनावरांचे छावणीचालक बिलांच्या प्रतीक्षेत, आर्थिक कोंडीने त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

बिजवडी (जि. सातारा) : माण- खटाव तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. छावण्यांमुळे शेतकऱ्यांची जनावरे जगण्यास मोठी मदत झाली. मात्र, छावणीचालकांना वर्ष होऊन गेले, तरी शासनाने अद्याप बिले न दिल्याने छावणीचालक आता प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. 

माण- खटाव तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल 2019 पासून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाने या चारा छावण्यांची माहे सप्टेंबर- ऑक्‍टोबर 2019 ची बिले थकीत ठेवली असल्याने छावणीचालक आर्थिक संकटात आले आहेत. तेव्हा या दोन महिन्यांचे छावण्यांचे थकित बिल त्वरित काढून देऊन छावणीचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत जगदाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

माण- खटाव तालुक्‍यात माहे एप्रिल ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत चारा छावण्या सुरू होत्या. दुष्काळी स्थितीत त्यामुळे जनावरांचे पालनपोषण झाले. सुरुवातील शासनाकडून छावण्याची बिले काढण्यास विलंब झाल्याने छावणीचालक अगोदरच कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर शासनाने एप्रिल ते ऑगस्ट 2019 महिन्यांची बिले चालकांना टप्प्याटप्प्याने दिली आहेत. मात्र, सप्टेंबर - ऑक्‍टोबर महिन्यातील बिले थकवल्याने छावणीचालक पुन्हा आर्थिक संकटात सापडला. 

अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन

आता या थकलेल्या बिलांना कित्येक महिने झाले, तरी शासनाने या बिलांसाठी अनुदान दिलेले नाही. 
नुकतीच याप्रश्‍नी छावणीचालकांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना छावण्यांचे बिल मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. त्यांनीही तत्काळ या निवेदनाची दखल घेत शासन - प्रशासनाशी संपर्क करून लवकर अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही श्री. जगदाळे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT